आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

जनदूत टिम    01-Jul-2021
Total Views |
सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. पडळकर रात्री ते मोटारीने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गाडीवर दगड मारला.

gopichand-padalkar4_1&nbs 
 
त्यात त्यांच्या गाडीची काच फुटली आहे. ‘शरद पवार यांना मी मोठे मानत नसून राष्ट्रवादी ही साडेतीन जिल्ह्यांपुरतीच आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्याचा राग मनात ठेवून तरुणाने पडळकरांच्या गाडीवर दगड फेकला असावा, असा पोलिसांना संशय आहे.