पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपलं

जनदूत टिम    09-Jun-2021
Total Views |
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते वाहतुकीला बसला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे.

Rain_1  H x W:  
 
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आवश्यक हवामान तयार झाल्याने मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 24 तासांत मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होईल, अशी शक्यता आहे. शिवाय येत्या काही दिवसांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.