गुरुमाता आनंदी माताची पुण्यतिथी साजरी

08 Jun 2021 12:05:46
पेण : परमानंद आश्रमाच्या गुरु माता आनंदी मातेची २१वी पुण्यतिथी ट्रस्ट तर्फे साधेपणाने परमानंद वाडी दादर येथे सालाबादप्रमाणे कोविड नियमाचे पालन करून साजरी करण्यात आली.
 
ashram44_1  H x
 
सकाळी ७ ते ८.३० पर्यन्त अभिषेक,तर पारंपरिक भजन व कीर्तन आयोजित न करता दुपारी ट्रस्ट चे अध्यक्ष कृष्णकांत पाटील, व कार्यध्यक्ष उदय पाटील, सल्लागार, कार्य करिणी सदस्य रायगड भूषण जयंपाल पाटील व सरचिटणीस गोरखनाथ पाटील यांच्या हस्ते वडाचे वृक्षरोपण करण्यात आले. तर सायंकाळी आनंदी मातेच्या तसबरीवर पुष्पवृष्टी व आरती घेण्यात आली.
 
ashram558_1  H  
  • परमानंद आश्रमात पुण्य तिथी साजरी व वृक्ष लागवड करताना ट्रस्ट चे पदाधिकारी(छाया- विकास रणपिसे) 
 
यासाठी सर्वांनी मास्कचा वापर केला होता. ट्रस्ट चे उपाध्यक्ष एकनाथ पाटील, सहसचीव नरेंद्र म्हात्रे, कार्यकरिणी सदस्य सुरेश म्हात्रे, महेंद्र भोईर, सो.नलिनी पाटील, सुग्नधा पाटील, हिरू बाई पाटील हे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0