गुळवेल औषधाचा कातकरी बांधवांना आर्थिक आधार

जनदूत टिम    08-Jun-2021
Total Views |

  • बड्या कंपन्यांकडून ३५० टनांची मागणी

कसारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले, काहींच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुन्हाड कोसळली. हातावर पोट असलेल्या कष्टकरी आदिवासी कातकरी बांधवांवर तर उपासमारीची वेळ आली.
 
adivasi-inmarathi-4_1&nbs
 
या परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजबांधवांना एकत्र करून शहापूर येथील सुनील पवार या तरुणाने आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेच्या वनधन विकास केंद्राच्या माध्यमातून एक हजार ८५५ कातकरी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिक आधार दिला आहे. कोरोना महामारीत गुळवेल या वनस्पतीला प्रचंड मागणी आहे. हिमालया व डाबर या कंपन्यांनी सध्या 390 टनांची मागणी नोंदवली आहे. हे लक्ष पूर्ण झाल्यानंतर याच माध्यमातून संस्थेला दीड कोटींची ऑर्डर मिळणार आहे.
 
प्रधानमंत्री - वनधन विकास योजनेअंतर्गत व राज्याच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तसेच ट्रायफेडच्या माध्यमातून सुरू झालेल्या शहापूर वनधन विकास केंद्रांतर्गत शहापूर, मोखावणे, ढाकणे, वेहळोली,खरीड अल्याणी या केंद्रांवर वनौषधी खरेदी केली जात आहे. ही वनौषधी तेथेच सुकवून त्याचे पॅकिंग करून त्याचे डाबर, हिमालया,बैद्यनाथ, सारंगधर, अभ्यंकर, झंडू व इमामी यांसारख्या नामांकित कंपन्यांना पुरवलीजाते.
 
लॉकडाऊनच्या कालावधीत एका केंद्रावर ३०० आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. वीटभट्टी, ऊसतोडणी व कोळसा खाणीत काम करून उपजीविका करणारा कातकरी समाज विखुरलेला आहे. सततच्या स्थलांतरामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरच रोजगार मिळत असल्यामुळे हे स्थलांतर थांबण्यास मदत होणार आहे..
२०१८ मध्ये आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली. शबरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, सहायक योगेश पाटील तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते तथा संस्थेचे सल्लागार अरुणपानसरे यांच्या मदतमार्गदर्शनात तसेच आदिवासी विकासमंत्री अॅड. के.सी. पाडवी व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने ही संस्था काम करीत आहे.
शहापूर तालुक्यातील वनौषधी
गुळवेल, हिरडा, बेहडा, आवळा, रिठा, सफेद मुसळी, नागरमोथा, वावडिंक, निमपत्ता, मोरिंगा, सर्वप्रकारच्या संमिंधा, साग बी, पळस बी, जांभूळ बी, पळसाची पाने, निरगुंडी पाला, इंद्रजव, गोरकमुंडी या वनोंषधी जमा केल्या जातात.

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली गुळवेल काढ्याची माहिती
आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविड नियमावलीचे पालन करतानाच ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांसह गुळवेल काढा पाजून कोरोनामुक्ती मिळविल्याची माहिती ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वाल्हीवरेगावचे सरपंच रघुनाथ खाकर आणि कळबांड गावच्या आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडीवले यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी राज्यातील सरपंच आणि आशासेविकांशी ऑनलाइन संवाद साधून त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यावेळी खाकर आणि भोंडीवले यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून ठाकरे यांच्याशी संवाद साधून गुळवेल काढ्याची माहिती त्यांना दिली.
 
या दोघांनी मनोगत व्यक्त करताना आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि कोरोनावर नियंत्रण मिळवताना कशाप्रकारे उपाययोजना केल्या, त्यासाठी कोणकोणत्या समस्यांना तोंड देऊन गाव कोरोनामुक्त केले आदी माहिती कथन केली.
मुख्यमंत्र्यांशी बोलताना आशा स्वयंसेविका भोंडीवले यांनी कोरोनाच्या काळात माझे कुटुंब, माझी जबाबदारी, अभियानाच्या वेळी सर्वेक्षण करून कोरोना रुग्णांसह क्षयरोग, मधुमेय, कर्करोग, सारी, उच्चरक्तदाब या आजारांच्या व्यक्तींनादेखील संदर्भसेवा दिल्याचे सांगितले. या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे आदी उपस्थित होते.
वाल्हीवरे गावात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसून गाव पूर्णतः कोरोनामुक्त असल्याचे सरपंच खाकर यांनी सांगितले. गावात संसर्ग होऊ नये यासाठी मार्च २०२०लचि गाव लॉकडाऊन केले.गाव दक्षता समिती स्थापन, करुन नागरिकांना कोरोनाची आणि लक्षणाची माहिती दिली. गावाला वारंवार हात धुण्याची सवय लावली. गाव माळशेजच्या पायथ्याशी असल्याने पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी भर दिला. गावातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले. तसेच गावातल्याच जंगलात मिळणारी गुळवेल’चे प्रत्येक घरात वाटप करून लोकांना गुळवेल’चा काढा प्यायला लावला. त्याचबरोबर जास्तीत नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. तिसया लाटेचीदेखील गावाने तयारी केली असून, गावकरी उत्तम सहकार्य करत आहेत. त्यामुळे गाव अखेरपर्यंत कोरोनामुक्त राहील, असा ठाम निर्धार व्यक्त केला.