शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवशंभू प्रतिष्ठानकडून पालीत रक्तदान शिबिराचे आयोजन

07 Jun 2021 12:07:17
पाली/गोमाशी : शिवशंभु प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रविवारी (ता.6) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालीतील मराठा समाज सभागृहात हे शिबिर संपन्न झाले.
 
shibir88_1  H x
 
या शिबिराचे उद्घाटन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या संकटात रक्तदानाचा तुटवडा भेडसावत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबिर उपयुक्त ठरले आहे. यावेळी 30 हुन अधिक दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून छत्रपतींना अभिवादन केले.
 
यावेळी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार, मराठा समाज हॉलचे अध्यक्ष गणपत सितापराव, शिवशंभु प्रतिष्ठान जिल्हा उपाध्यक्ष महेश भोईर, शिवशंभु प्रतिष्ठान सुधागड तालुका अध्यक्ष गणेश मोरे, कार्याध्यक्ष गणेश भोईर, पाली शहर अध्यक्ष योगेश सुरावकर, तालुका युवा अध्यक्ष साहील खैरे, उपाध्यक्ष सागर सावंत, संपर्क प्रमुख धनंजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0