आळंदीतील शैक्षणिक संस्थांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घ्यावी

जनदूत टिम    29-Jun-2021
Total Views |

  • नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सर्व शैक्षणिक संस्थांकडे केली मागणी

आळंदी : संपूर्ण महाराष्ट्र हा कोरोणाच्या तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर असताना अशा स्थितीमध्ये शासनाकडून वारंवार लाॅकडाऊन जाहीर होत असल्याने अनेक कुटुंबाची कामे लाॅकडाऊन मध्ये बंद झालेले आहेत लाॅकडाऊन मुळे सर्व सामान्य नागरिकांकडे कोणतेही काम नसल्याने त्यांची अर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे अशा हालाखिच्या परिस्थिती मध्ये पालकांकडून शाळेची शैक्षणिक फी भरणे कठीण होत आहे.
 
ala588_1  H x W
 
आळंदी नगरपरिषद हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांनी पालकांच्या अर्थिक परिस्थिती पाहून शैक्षणिक फी ही ५० टक्केच घेण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे सचिन गिलबिले यांनी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा, तसेच शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांकडे निवेदनामार्फत केली आहे.
 
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात असलेल्या विना अनुदानित संस्थांनी शैक्षणिक फी मध्ये ४० टक्के सवलत देण्यात यावी असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे याच अनुषंगाने आळंदी नगरपरिषद कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्थांनी सुध्दा हा समाजोपयोगी निर्णय घेण्यात यावे अशी मागणी नगरसेवक गिलबिले यांनी निवेदनात केली आहे.