भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!!!

29 Jun 2021 18:41:17
ठाणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्मानिय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख वसंतजी लोणे यांच्या नेतृत्वाखाली कोसले गावचे भाजपा कार्यकर्ते व पळसोली सेवा सोसायटीचे उप चेअरमान लक्ष्मण भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां सह शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सौ लताताई लक्ष्मण भोईर यांची पळसोली महिला उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
ss_1  H x W: 0
 
या प्रवेश प्रसंगी भिवंडी ग्रामीण आमदार शांतारामजी मोरे, भिवंडी तालुकाप्रमुख विश्वासजी थळे साहेब, ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती कुंदनजी पाटील,भिवंडी पंचायत माजी उपसभापती प्रकाशजी भोईर, विष्णुजी चंदे,तालुका कार्यकारिणी सदस्य तुकाराम कडव, युवासेना जिल्हा सचिव अल्पेश भोईर, संपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण रमेश बांगर, तालुका सहकार अध्यक्ष अनिल चौधरी, युवासेना समन्वयक संतोषजी सिरोशी, तालुका सचिव नामदेव बुटरे तसेच विभागातील शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुकाप्रमुख वसंतजी लोणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी एकमताने काम करावे याबाबत सूचना केल्या तसेच येत्या काही दिवसांत कल्याण ग्रामीण ची नवीन कार्यकारिणी निर्माण करण्याबाबत माहिती दिली. जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना सहकार्याच्या भावनेतून काम करावे असे सूचित केले.
Powered By Sangraha 9.0