रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा पदोन्नतीतील आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा

28 Jun 2021 20:14:20
मुंबई : रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य यामध्ये समाविष्ट असलेल्या विविध कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मागासवर्गीय पदोन्नतेतील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा जीआर 7 मे रोजी काढण्यात आला होता त्याविरोधात आझाद मैदान मुंबई येथे शनिवारी मोर्चा काढण्यात आला.
 
rip655_1  H x W
 
यावेळी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने केंद्रीय महासचिव आत्माराम पाखरे, केंद्रीय कोषाध्यक्ष सिद्धार्थ रणपिसे, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख संजय थोरात , ठाणे जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ सरनोबत, जिल्हा मार्गदर्शक सेवक नागवंशी, जिल्हा पदाधिकारी सुरेश खैरनार, भरत चव्हाण, आत्माराम बिराडे, रिपब्लिकन फेडरेशन जिल्हा संघटक नवनाथ रणखांबे, शहापुर तालुका अध्यक्ष कमलाकर वांगीकर, मुरबाड तालुका अध्यक्ष विलास शिंदे, राजेंद्र सातपुते, युवराज सोनवणे, दिपक जटाळे, विशाल चंदने, शिरीष पानपाटील, अनिल पद्माने, दादाराव ढवळे,अनिल सांगळे, नीलकमल मेश्राम , सुनील संदानशिव, सुभाष जनबंधू , मुरबाड येथून आलेल्या महिला भगीनी व हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त मुंबई यांना आरक्षण हक्क कृती समितीच्या विविध मागण्या मान्य करण्याविषयी निवेदन देण्यात आले व पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे .
 
7 मे 2021 रोजीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा , आरक्षण समितीच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय व्यक्तीची निवड करावी. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. रिपब्लिकन फेडरेशन व आरक्षण हक्क कृती समितीत सामील असणाऱ्या विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदोन्नती आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी घोषणा दिल्या .
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ठाणे जिल्हा कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवून मोर्चा यशस्वी केला.
Powered By Sangraha 9.0