केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

27 Jun 2021 14:52:13

  • केंद्र सरकारने केले ओबीसी आरक्षण रद्द , काँग्रेसने केला निषेध

उरण : अत्यंत महत्वाचा असलेला ओबीसी आरक्षण कोर्टात टीकावे यासाठी योग्य तो पाठपुरावा केंद्र सरकारने केले नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टा द्वारे आरक्षण रद्द करण्यात आले. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे आता ओबीसी संवर्गांना मिळणारे आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रात ओबीसी संवर्गात तीव्र संताप पसरला आहे. आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

uran55_1  H x W 
 
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार ओबीसीची बाजू मांडण्यात अपयशी ठरले आहे .त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उरण शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
 
उरण शहरात काँग्रेस कार्यालय समोर केंद्राने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने निषेध करत जोरदार निदर्शने केली यावेळी जे डी जोशी -उरण तालुकाध्यक्ष, मिलिंद पाडगावकर -जिल्हा उपाध्यक्ष, गणेश म्हात्रे -उपाध्यक्ष, किरीट पाटील -शहराध्यक्ष, रेखाताई घरत -महिला तालुकाध्यक्ष, अफशा मुकरी -शहर अध्यक्ष महिला, उमेश भोईर -ओबीसी प्रदेश सरचिटणीस, कमळाकर घरत -सेवादल अध्यक्ष,लंकेश ठाकूर -युवक उपाध्यक्ष उरण विधानसभा मतदार संघ, सदानंद पाटील-केगांव अध्यक्ष , सुनील काठे, जयवंत पडते, रामकृष्ण म्हात्रे, भालचंद्र घरत, उमेश ठाकूर, प्रवीण पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.ओबीसीची जणगणना करून केंद्राने ओबीसी संवर्गांना पूर्वीचे आरक्षण लागू करावे, केंद्र सरकारने ओबीसीचे आरक्षण टीकावे यासाठी न्यायालयात सक्षम बाजू मांडावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी केली.
 
Powered By Sangraha 9.0