मंत्री संदीपानजी भुमरे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा

जनदूत टिम    24-Jun-2021
Total Views |
मुंबई : रोहयो मंत्री मा ना श्री संदीपानजी भुमरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून ३ जुलै रोजीच्या “शेत तिथे रस्ता अभियान (पहिला टप्पा) लोकार्पण व हरित शिवरस्ते अभियान कार्यान्वयन” सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे अशी विनंती केली.
 
rohoya22_1  H x
 
औसा मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत ५८१ किमी लांबीच्या शेतरस्त्यांचे मातीकाम व दबई काम तसेच त्यापैकी १२० किमी लांबीच्या शेतरस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण काम पूर्ण झाले आहे. शिवरस्त्यांवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये म्हणून हरित शिवरस्ते अभियानाअंतर्गत शिवरस्त्यांच्या दुतर्फ़ा वृक्षलागवड करण्यात येणार आहे. ३ जुलै, २०२१ रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते व लातूरचे पालकमंत्री मा ना श्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली “शेत तिथे रस्ता अभियान (पहिला टप्पा) लोकार्पण व हरित शिवरस्ते अभियान कार्यान्वयन” सोहळा योजिला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे अशी विनंती राज्याचे रोहयो मंत्री मा ना श्री संदीपानजी भुमरे यांची भेट घेऊन त्यांना केली. आदरणीय भुमरेजी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याविषयी सहमती दर्शवली असून त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा तर वाढणार आहेच पण शेतकरी हिताच्या अभियानांना पाठबळ सुद्धा मिळणार आहे.
 
मागील काही दिवसात “ग्रामपंचायतींना शास्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाअंतर्गत गायरान व गावठाण जमिनीवर १००% फळबाग लागवड करण्यासाठी परवानगी द्यावी, मनरेगाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पूर्वीप्रमाणे ३६५ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा, मनरेगा कामांना गती देण्यासाठी मनरेगाअंतर्गत कुशल कामांचा निधी आयुक्त, मनरेगा कार्यलय ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर उपलब्ध करून द्यावा तसेच मनरेगाअंतर्गत जनावरांचा गोठा कामाचे ९२:०८ ऐवजी ६०:४० प्रमाणात अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मान्यता द्यावी” अशा मागण्यांचे निवेदन रोहयो मंत्रालयाला पाठवले होते. रोहयो मंत्री मा ना श्री संदीपानजी भुमरे यांच्याशी उपरोक्त मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. माझ्या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच निर्णय होतील असा
विश्वास आहे.