वर्तकनगर प्रभाग समिती प्रभाग क्र. ४ घोडबंदर रोड परिसरात शिवसेनेची वेगवान लसीकरण मोहीम सुरु

जनदूत टिम    23-Jun-2021
Total Views |
ठाणे : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी शिवसेनेची सर्वांत मोठी आणि वेगवान यशस्वी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ठाण्याचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकार्यांने शिवसेना शाखा प्रमुख हेमंत खांडेकर यांच्या वतीने मानपाडा आणि घोडबंदर रोड परिसरात देव दर्शन गृह संकुलात शिवसेना आणि सफायर रुग्णालयाच्या मदतीने लसीकरण शिबीर आयोजित करून त्यात १८ वर्ष युवक ते जेष्ठ नागरीक या वयोगटात ५०० नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केले होते.

thane55_1  H x  
 
शिवसेना व सफायर रुग्णालयाच्या सहकार्याने राबविलेल्या या लसीकरण मोहिमेस मानपाडा आणि घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद दिला .या लसीकरण शिबिरास आज महापौर नरेश म्हस्के यांनी भेट देवून लसीकरणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांचे आणि आयोजक शाखाप्रमुख हेमंत खांडेकर आणि सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच यावेळी केबल सेना अध्यक्ष मंगेश वाळज ,विभाग प्रमुख राजेश शिंदे,शाखाप्रमुख दीपक साळवी , आनंद टोनी ,युवा सेना शहर अध्यक्ष नितिन लंडगे, गुरुद्वारा प्रमुख देविंदरजी कौर निज़र,किड़ज़ी प्रमुख आनुपमा मैडम आदी उपस्थित होते .
लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी हेमंत खांडेकर शाखाप्रमुख,नरेश अग्रवाल उपशाखा प्रमुख,सागर जाधव उपशाखा प्रमुख,जतीन उपाध्याय,शशांक कारके,सुप्रिया कांडे,मीना अग्रवाल,चेतना उपाध्याय,वर्तकनगर प्रभाग समिती
प्रभाग क्र. ४ सुप्रिया पांडे,संजीवनी भागवत,नवतेश्वर सिंग,मनज्योत सिंग,वैभव भोईर.यांनी विशेष प्रयन्त केले.संपर्क 7506025666