शहापूर तालुक्यात वादलाने अनेक घरांचे नुकसान

जनदूत टिम    11-Jun-2021
Total Views |
शहापूर : काल सायंकाळच्या सुमारे ५.०० वा वाशाला विभागातील कोथले येथे सुसाट्याचा वारा- वादल झाल्याने दहा ते पंधरा घरावरील कौले व पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 
barora44_1  H x
 
यातील तीन घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे,ऐन सुगीच्या दिवशी वादळ वारा झाल्याने श्रीमती.काशीबाई वीर व निवृत्ती वीर यांच्या घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून पुढच्या दिवसांसाठी कुटुंबासाठी घेतलेला किराणा सामाण व अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांनी या घटनेची माहिती पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दूरध्वनीवरून दिली.पालकमंत्री महोदयांनी तत्काळ जिल्हाधिकारीनार्वेकर यांना नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
 
पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज कोथले येथे मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब , तालुका प्रमुख मारुतीजी धिर्डे, जेष्ठ नेते काशिनाथजी तिवरे यांनी प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत कोथले गावात भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पहाणी केली.व शहापूर शिवसेना पक्षाच्या वतीनं या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली.या कुटुंबाला शासनाच्या वतीने तत्काळ मदत करण्याचा सूचना मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेबांनी आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी श्री .दिनकर यांना केली.यावेळी अरुनजी अधिकारी,प.स.सदस्य एकनाथ भला,विभाग प्रमुख विलास धानके,भाऊ धानके,सरपंच जनार्दन वीर,सीताराम भगत व ग्रामस्थ उपस्थित होते.