पक्ष संघटनेपेक्षा कोणीही मोठे नाही- आमदार सुनील भुसारा

जनदूत टिम    11-Jun-2021
Total Views |

  • जव्हारला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन उत्साहात

जव्हार : जव्हार पक्षाची पदे भूषवून किंवा पक्षाचा उपयोग करून अनेक मोठे झाले, तर काही राष्ट्रवादी पक्षाला कमी लेखून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने २२ वर्षात जो विस्तार केला आहे तो सर्वांचे मनोबल वाढवणारा असून, भल्याभल्यांना चित करणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या शरदचंद्र पवार यांचे आपण कार्यकर्ते आहोत, हेच आपलं नशीब असल्याचे मत आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी व्यक्त केले.
 
bhusara44_1  H
 
पक्षाच्या २२ २२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जव्हार येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भुसारा म्हणाले की, कमी वय असूनही देदीप्यमान कामगिरी करणारा हा आपला एकमेव पक्ष आहे. आठवणींना उजाळा देताना भुसारा म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापना मेळाव्यात मीमाझे वडील चंद्रकांत भुसारा यांच्यासोबत गेलो होतो. तिथून आज आमदार होण्यापर्यंतच्या प्रवासात पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी खूप बळ दिले. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष असून, आज आपली जि. परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत परिषदांमध्ये सत्ता आहे. आपण लोकांचाही विकास करायचा असून, कार्यकर्त्यांनी गावागावात जावून लोकांच्या गरजा आहेत, त्या लेखी स्वरूपात कळवाव्यात. त्या नक्की सोडवू, असे भुसारा म्हणाले.
 
मान्यवरांचे भाषण
बांधकाम व अर्थ समिती सभापती काशिनाथ चौधरी, सरचिटणीस अनिल गावंड, सुरेश पवार, महिला जिल्हा अध्यक्ष कीर्ती मेहता, मृणाली नडगे, ज्येष्ठ नेते नासिर मेमन, रियाज मणियार, कमळाकर धुम, नरेश आकरे, वरुण पारेख आदींनी भाषणे केली.