दि.बा.पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आगरी कोळी कराडी समाजाचे साखळी आंदोलन

विठ्ठल ममताबादे     11-Jun-2021
Total Views |
उरण : गुरुवार दिनांक 10/6/2021 रोजी नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे हृदयसम्राट, माजी खासदार लोकनेते मा. दि.बा.पाटील साहेबांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती तर्फे 10 जून 2021 रोजी मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले होते.यावेळी या आंदोलनाला आगरी कोळी कराडी समाजाचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
 
pali55_1  H x W
 
राज्य सरकारला गांभिर्याचा इशारा देण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्त जनता स्वयं स्फुर्तीने रस्त्यावर उतरून उरण- पनवेल महामार्गावर मानवी साखळीचे आंदोलन केले.बोकडवीरा ते करळ -सावरखार दरम्यान उरण शहर, बोकडवीरा,पाणजे,डोंगरी,फुंडे,जे.एन.पी.टी टाऊनशिप, नवघर,कुंडेगाव,पागोटे,भेंडखळ, जसखार,करळ-सावरखार,सोनारी,जासई, दिघोडे, दास्तान फाटा, धुतूम, कोप्रोली, चिरनेर, पिरकोन, सारडे, खोपटा, गोवठणे, कळंबुसरे, करंजा, बोरी, मोरा, भवरा, केगाव, नागाव, मुळेखंड, चाणजे, नवीन शेवा आदी गावातील ग्रामस्थ उरण-पनवेल रस्त्यावर उपस्थित होते.प्रकल्पग्रस्त,कष्टकरी, महिला ,युवा वर्ग, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
सदर मानवी साखळीला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी, आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध संस्था, संघटनांनी एकत्र येत शांततेने सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क सॅनिटायझरचा वापर करून आपले साखळी आंदोलन यशस्वी करून सरकारचा निषेध केला.व नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी या साखळी आंदोलनातून प्रशासनाकडे केली आहे.