कोरोना व्हायरस;स्मशानभुमीही गर्जत आहे

- अंकुश शिंगाडे    09-May-2021
Total Views |
कोरोना व्हायरस आला व त्यानं भल्याभल्यांना घडकी भरली. त्यातच कोरोनाची दुसरी लाट आली आणि काही औषधाचा शोध लागूनही कोरोना दबला नाही. त्यानं आपला पावित्रा बदलविला आणि तो वेगळ्या रुपात आला. त्यातच ह्या दुस-या लाटेतील कोरोनाही जीवघेणाच ठरला. त्यातच त्यानं एवढे लोकं मारले की बहुतेक देशांना धडकीच भरायला लागली. त्यातच स्मशानालाही धडकी भरायला लागली. आज स्मशानभुमीत एवढ्या रांगा असतात की त्या रांगेतील क्रमासाठी भांडणं होत असून लोकं तीव्रतेनं भांडायला लागले आहे. प्रेतं जाग्यावरच राहिली. हे सगळं का होत आहे तर त्याचेही कारण आहे. ते कारण म्हणजे लाकडं न मिळणं तसेच जाळायला जागा न मिळणं.
 
स्मशानात जाळायला जागा न मिळणं ही शोकाची गोष्ट आहे. जागा......... त्यामुळंच लोकांमध्ये वाद. एवढी देशात जागा आहे की जी बेवारस पडलेली आहे. तरीही वाद. कोरोनानं मृत झालेल्या शरीराला आपल्या घराजवळच्याच स्मशानभुमीत जाळायला हवं असा नियम आहे का? नाही ना. त्या मृतदेहाची विल्हेवाट ही ओसाड माळरानावर, डोंगरावर किंवा खुल्या जागेतही करता येवू शकते. तसेच त्याला दफनही करता येवू शकते. पण आपल्या परंपरा यात आड येतात. म्हणून आपले भांडणे. तेही मृतदेह जाळण्यासाठी.
 
महत्वाचं म्हणजे देश संकटात असतांना अशा मृत शरीरावरुन भांडण करणं बरोबर नाही. देशाचं संकट लक्षात घेता एकाच चिंतेवर दोन दोन चार चार मुदडे जाळणे गरजेचे आहे. यासाठी महत्वाचं आहे मृत शरीराची विल्हेवाट लावणं व त्यावर असलेल्या जंतूंची विव्हेवाट लावणं. अलिकडे कोरोना व्हायरस बहुतेक जगच संपवायला निघाला की काय असे चित्र आज एकंदर परिस्थीतीवरुन वाटायला लागलं आहे. त्याचे कारणही आहे.
 
smashan-bhumi-inmarathi_1
 
आज कोरोनानं एवढे लोकं मरत आहेत की त्याची विल्हेवाट लावायला शेकडो झाडं कापावी लागत आहेत. त्यातच जी वृक्ष मानवालाच नाही तर मानवासारख्या इतर प्रजातीला ऑक्सीजन पुरवतात. तिच झाडं या प्रेतांच्या विल्हेवाटीसाठी कापावी लागत असल्यानं वातावरणात असलेल्या वीस टक्के ऑक्सीजनची पातळी, वातावरणातील ऑक्सीजन मोजल्यास कमी झालेली नक्कीच दिसेल. त्यातच हे शरीरावरील कोरोनाचे जंतू पुरेपूर मरावेत म्हणून त्या मृत शरीराला देण्यात येणा-या अग्नीतून वातावरणात जो धूर पसरतो. तोही घातकच असून त्याच धुरातून आणखी वायूप्रदूषणाचा संभाव्य धोका टाळता येत नाही. त्याच धुळीचा परिणाम हा मानवच नाही तर इतर प्राण्यांवर होत असून आज इतर प्राण्यांचीही मृत्यूची संख्या वाढत असलेली दिसत आहे. ह्याच मृतांच्या धुळीतून श्वसनाचे आजार होण्याची चिंता ग्रासत असलेली संशोधकांना दिसत आहे.
 
काही लोकं म्हणतात की कोरोनानं मृत झालेल्या शरीराची विल्हेवाट लावायची असेल तर मृत शरीराला जाळणे उत्तमच. त्यामुळं पुरेपूर जंतू जळून नष्ट होतात. त्यांचं बरोबर आहे. पण इकडे ते मृत शरीर जाळण्यासाठी जीवंत असलेलं अख्खं झाड तोडावं लागतं त्याचं काय? इकडे झाडाअभावी ऑक्सीजन कमी होत आहे त्याचं काय? अन् मृत शरीराला नाही जाळलं आणि त्याला दफनच केलं तर ते जंतू मरु नाही शकणार का? त्यातच पर्यावरणाचं संतूलन बिघडतं त्याचं काय? ते जंतू मरुही शकतीलच ना. कारण कोणत्याही सजीव शरीराला जीवंत राहण्यासाठी हवा, पाणी व अन्न यांची गरज असते. मृत झालेल्या शरीरावर काही विशिष्ट वेळेपर्यंतच रोगजंतू टिकतात. समजा ते शरीर जमीनीत गाडलं जरी गेलं तरी काही तासच ते जंतू जीवंत राहतील. त्यानंतर ते नष्ट होतील यात शंका नाही. कारण एकदा का शरीर मातीत दफन केलं गेलं की त्या शरीरातील रोगजंतूला हवा, पाणी आणि अन्न किती दिवस मिळणार. त्यातच त्या मृत शरीराची विल्हेवाट लावतांना जो मीठाचा थर लावतात. त्या मीठात सोडीअम क्लोराईड असतं. जे सोडीअम आणि क्लोरीन कोणत्याही सजीवांसाठी घातक असतं. त्याच्या जास्त प्रमाणानं रोगजंतू टिकत नाहीत, एवढं ते घातक असल्यानं रोगजंतू मातीत मुदडे दफन केल्यानं टिकतील का? याचं उत्तर नाही असंच येईल.
 
पर्यायानं सांगायचं म्हणजे कोरोनानं मृत झालेल्या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी त्या शरीराला दफन केलं गेलं तरी काही हरकत नाही. ते शरीरं दफन करण्यासाठी स्मशानभुमीत रांगा लावण्याची गरज नाही. तसेच या रांगेवरुन वाद करण्याची गरज नाही. माणसात जरी गड्डे करण्याची ताकद नसेल, तरी जे सी बी नं गड्डेही करता येतात आणि त्याला बुझवताही येतात.
आपल्याला माहित असेल की पुर्वीच्या काळी आताच्या काळापेक्षा अंधश्रद्धा जास्त प्रमाणात होत्या. मृत झालेल्या शरीरात आत्मा परमात्मा निवास करीत असून त्या आत्मा परमात्मा मरणोपरांत आपल्याला झोंबतात अर्थात सतावतात असा लोकांचा युक्तीवाद असायचा. भूत असतं आणि ते सतावतं असंही लोक मानायचे. त्यातच काही लोकं तांत्रीक, मांत्रीक असायचे. हे तांत्रीक लोकं याच गोष्टीचा गैरफायदा घेत आपल्याकडून पैसा वसूल करुन आपल्याला फसवीत असत. समजा काही कारणानं असे तांत्रीक मांत्रीक मरण पावले तर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ही सामान्य लोकांसाठी असलेल्या स्मशानभुमीत करीत नसत तर त्यांना शिवेवर असलेल्या पांधण रस्त्यावर गाडलं जाई. हिच स्थिती बारातीण महिलांबाबत होती. समजा एखादी स्री प्रसूत झाली व तिला व्यवस्थीत औषध न मिळाल्यानं ती मरण पावली तर तिचीही विल्हेवाट ही अशा सामान्य स्मशानभुमीत करीत नसत तर शिवेवर किंवा डोंगरावर तिची विल्हेवाट करण्यात येत असे. त्याचं कारणंही तसंच असायचं. ते कारण म्हणजे भुताटकीचं कारण नव्हतं तर शास्रीय कारण होतं.
 
सामान्यतः बारातीण स्रीयांपासून जास्त आजार पसरण्याची स्थिती असायची. कारण बाळ जन्माला घातल्यावर ती कमजोर झालेली असायची. तिच्या शरीरावर रोगजंतूचे प्रमाण जास्त असायचे. तसेच तांत्रीक, मांत्रीक.........ते तर महिनोगणती अंघोळच करायचे नाही. घाणीत राहायचे. त्यामुळं त्यांना जेव्हा रोग जखडत असे. तेव्हा त्यांच्या शरीरावर अळ्या पडलेल्या असायच्या. त्यातच जंतूही जास्त असायचे. हे जंतू जवळपासच्या स्मशानभुमीतून उडत उडत आपल्या गावात येवू नये व रोग लागण होवू नये म्हणून लोकं त्यांची विल्हेवाट दूरवर करीत. त्यातच त्या काळात रोगांच्या साथीच्या साथी येत. याही दृष्टीकोणातून त्यांच्या प्रेताच्या विल्हेवाटीच्या योजना आखल्या जायच्या. त्यातच अशा लोकांना जास्तकरुन जाळण्याच्या प्रथा नव्हत्या. त्यांना दफनच केले जाई.
काही दिवसानंतर याच गोष्टीला प्रथेचं स्वरुप आलं. त्यात अंधश्रद्धा शिरवली गेली. त्यात भुताटकी भरली गेली. तांत्रीक, मांत्रीकांचा भूत झाला. बाळातीणीची हडळ बनली.
 
आज कोरोना असाच थैमान घालत आहे. हा साथीचा रोगच आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला यात असल्या अंधश्रद्धा शिरविण्याची गरज नाही. आपल्याला त्या मृत झालेल्या शरीराची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मग ती विल्हेवाट स्मशानभुमीतच लावली पाहिजे असे नाही. ती विल्हेवाट आपण कुठेही लावू शकतो. तसेच त्या विल्हेवाटीसाठी जाळून प्रदूषण करणं वा जाळण्यासाठी लाकुड तोडणं हा पर्याय नाही. आपण ते शरीर जमीनीत पुरुही शकतो. तेव्हा आपण स्मशानात रांगा लावण्याऐवजी त्या प्रेतांना अशा गावाजवळच्या डोंगरावर किंवा माळरानातील ओसाड जमीनीवर सध्यापुरती व्यवस्था केली तर काय हरकत आहे? हं थोडा वेळ लागेल आणि थोडासा मृतदेह नेण्यासाठी खर्चही येईल. पण तिच गोष्ट सर्वात सोईस्कर असेल यात काही शंका नाही..समजा मृतदेहांना पुरलं तर लाकुड कापणंही बंद होईल. पर्यावरण संतूलन कायम राहिल.
 
ऑक्सीजनचाही तुटवडा भासणार नाही. निसर्गसाखळीही व्यवस्थीत राहिल. त्यातच जंतूही नष्ट होतील ही सत्यता नाकारता येत नाही. याच गोष्टीसाठी की काय आज स्मशानभुमीही गर्जत आहे. कारण तिच्यावरही भार झाला आहे. तिला त्रास होत आहे नव्हे तर ती ओरडत आहे. एखाद्या जन्मलेल्या बाळासारखी. कारण तिला आज फक्त जागोजागी मुदडेच मुदडे जास्त दिसतात. थोडीशीही शांतता दिसत नाही. ते घुबडाचे आवाज ऐकायला येत नाही. त्या बाभळीवरचे कावळे दिसत नाही आणि दिसत नाही ते कडूनिंबाच्या झाडावर उलटे लटकलेले वटवाघळं. आज स्मशानभुमी त्यासाठी रडतही आहे आणि ओरडतही आहे. केवळ कोरोना एके कोरोना पाहून तिही उदासली आहे आणि निराश झाली आहे त्या स्मशानात लागलेल्या रांगा पाहून. अशा रांगा कधीच तिनं जीवनात कधीही पाहिलेल्या नसाव्यात. तसेच तिला राग येतो आहे आज. त्या भांडणा-या माणसांचा. ती विचार करीत आहे की देशात एवढं मोठं संकट असतांना व कोरोनानं एवढे लोकं मरत असतांना ही माणसं अजून सुधारलेली नाहीत. स्मशानात प्रेतं जाळण्यासाठीही भांडतात आहेत.
 
तिचं बरोबर आहे विचार करणं. कारण आपल्याला आजही कळलं नाही की आपण कसं वागावं. आपण आजही तोंडाला मास्क लावत नाही. आजही आपण स्वतःची काळजी घेत नाही. आजही आपण सुरक्षीत अंतर पाळत नाही. आजही आपण आपले हात नीट स्वच्छ धूत नाही. हे स्मशानभुमीचं रागावणं एकप्रकारचं ठीक आहे. पण तिचं रुसणं बरोबर नाही. ती एकदा जर रुसली ना तर भल्याभल्यांची वाटच लावून टाकेल. एवढा कहर माजवेल की कोणी विचारच करणार नाही. मग आपल्याही प्रेताची विल्हेवाट लावायला ती एवढीशी जागा देणार नाही.,आपली प्रेत अशीच सडत राहतील. गिधाडांचे कोल्हेकुत्र्यांचे भक्ष बनण्यासाठी. एकदा का स्मशानभुमी रुसली की ज्याला आपण आपला आपला म्हणतो ना. तोही आपला नसेल. म्हणून स्मशानभुमी आज ओरडत असली तरी तिला रागावू देवू नका. ती रागावत असली तरी चालेल पण तिला रुसू देवू नका. स्मशानात रांगा जरुर असू द्या. पण त्या रांगेवरुन भांडणं करु नका. तसेच घरातच राहा. विनाकारण शुल्लक शुल्लक कारणासाठी बाहेर पडू नका. देणेकरुन स्मशानभुमी रुसेल व आपल्याला नेस्तनाबूत करेल. कारण आता स्मशानभुमीही गर्जत आहे.
- अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०