ग्रामीण भागात कोरोनाचा कहर

जनदूत टिम    08-May-2021
Total Views |
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. ठाणे, कल्याण ग्रामीण भागासह भिवंडी, अंबरनाथ, शहापूर, मुरबाडमध्ये कोरोनामुळे बाधित झालेली रुग्णसंख्या आतापर्यंत २९ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मृत्युदर २.५२ एवढा सर्वाधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे.
 
coronasdmsdsdsd5465_1&nbs
 
ठाणे जिल्ह्यात कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर व मुरबाड हे ग्रामीण तालुके आहेत. ३० नोव्हेंबर २०२० मध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या १८ हजार १७६ होती. त्यानंतर डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते; मात्र यावर्षी अवघ्या पाच महिन्यांत सुमारे १० हजाराहून अधिक रुग्णांची नव्याने नोंदणी झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या २८ हजार ४५९ इतकी झाली आहे. यामध्ये सुमारे ७१८ जणांचा बळी गेला असून मृत्युदर २.५२ वर पोहोचला आहे. ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, मिरा- भार्इंदर, उल्हासनगर, भिवंडी महापालिकांचा सरासरी मृत्युदर १.५८ इतका आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण वाढला
ठाणे ग्रामीणची लोकसंख्या १३ लाख ८५ हजार २५४ आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात आहे; मात्र आरोग्य विभागतच सुमारे १७४ पदे रिक्त असल्याने कर्मचा-यांवर ताण वाढला आहे. ग्रामीण भागातील विविध तालुक्यांमध्ये ३३७ रुग्ण कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.६२६ रुग्ण कोव्हिड रुग्णालयात दाखल आहेत; तर ८४ रुग्ण इतर ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यापैट १०३ रुग्ण ऑक्सिजनवर; तर ८ जण व्हेंटिलेटरवर आहेत.घरी उपचार घेणान्यांची संख्याही एक हजार ८४५ इतकी आहे.