वासिंद महावितरणच्या सहायक अभियंता यांच्या बदलीची वासिंद मनसेची मागणी

जनदूत टिम    06-May-2021
Total Views |
वासिंद : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंदच्या वतीने वासिंद महावितरणचे अकार्यक्षम सहायक अभियंता अमोल बीरे यांच्या त्वरित बदलीची लेखी मागणी ही उपअभियंता महावितरण शहापूर येथे पत्राद्वारे करण्यात आली.
 
vasind77_1  H x
 
अमोल बीरे हे ग्राहकांशी अतिशय उद्धट पणे वागतात तसेच जनतेचे प्रलंबित प्रश्न हे सोडविण्यात अकार्यक्षम आहेत असा नाराजिचा सूर हा वासिंद परिसरातील जनतेत आहे त्या अनुशंगाने त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे , तसेच वासिंद मधील फौलटी मीटर बदलून द्यावेत या बद्दलची जुनी मागणीची दखल घेत फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सर्व फौलटी मीटर बदलण्यात येतील याची ग्वाही मा अविनाश कटकवार उपअभियंता शहापूर यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे यावेळी मनसेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते व महावीतरणच्या अधिकाऱ्यांना जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलाच फैलावर घेण्यात आलं आहे तसेच लोकांचे मीटर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कट करू नयेत, व लोकांना हप्त्यात बिल भरण्याची मुभा द्यावी असा इशाराही देण्यात आला आहे व येत्या काळात जनतेच्या समस्या सुटल्या नाहीत तर खळखट्याक चा इशाराही मनसे पदाधिकार्या कडून देण्यात आला