विजय पाटील यांच्या घरवापसीने ग्रामीण भागात काँग्रेसला बळकटी येणार : राम पाटील

जनदूत टिम    05-May-2021
Total Views |
वसई : शिवसेना नेते आणि २०१९च्या वसई विधानसभेचे सेनेचे उमेदवार विजय पाटील यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी केल्यामुळे विशेष करून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाला बळकटी येणार असून आगामी काळात निवडणुकीत याचा प्रत्यय येईल असे मत वसई तालुका ग्रामीण चे अध्यक्ष राम पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 
patil747_1  H x
 
पूर्वाश्रमीचे काँग्रेस प्रदेश सचिव, आणि मधल्या काळात सेनेत गेलेल्या विजय पाटील यांना पुन्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये घरवापसी केली.विजय पाटील यांचा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील खोडोपाड्यात दांडगा जनसंपर्क असून अनेक युवक मंडळे, महिला बचत गट ,शेतकरी यांना वेळोवेळी मदतीचा हात दिल्याने ग्रामीण भागात वेगळी ताकद त्यांनी निर्माण केली आहे.
 
यापूर्वी वसई पूर्व भागातील भाताने जिल्हा परिषद गटातून त्यांना जिल्हा परिषदेवर निवडून येऊन तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेमध्ये कृषी आणि दुग्ध पशुसंवर्धन सभापती पद मिळविले होते.२०१७ साली ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायत निवणुकांमध्ये परिवर्तन पॅनल चा प्रयोग करून बहुजन विकास आघाडी विरोधात सर्वपक्षीय मंडळींना एकत्र करून अनेक ग्रामपंचायत जिंकण्यामध्ये विजय पाटील यांचाच सिंहाचा वाटा होता. त्यामुळे असे ग्रामीण जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व पुन्हा कॉंग्रेसवाशी झाल्याने त्याचा पक्षाला विशेष फायदा होणार असून आम्ही त्यांचे स्वागत करतो असेही राम पाटील यांनी म्हटले आहे.