माणगांव वाहतूक पोलीस “कोरोना योद्धा” म्हणून ‘पोलीस साप्ताहिक’ कडून सन्मानित

जनदूत टिम    05-May-2021
Total Views |
माणगांव : पोलीस आणि जनतेचे व्यासपीठ म्हणून देशभर ऐक ओळख असलेल्या साप्तहिक ‘पोलीस तपास’ ही ऐक नोंदणी कृत वर्तमान पत्र आहे.देशातील पश्चिम भागातील अनेक राज्यात वितरित असलेल्या एकमेव साप्ताहिक आहे. श्री. राजु जाधव हे संपादक तथा मालक म्हणून आहे. तर साजिद बुखारी हे कार्यखारी संपादक, राहुल तुषार राणे उप संपादक आणि राहुल शांताराम देशमुख हे क्राईम रिपोर्टरचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून कार्यरीत आहे.
 
mnan44_1  H x W
 
‘पोलीस तपास ‘संस्थेकडून नुकताच काही दिवस पूर्वी वाहतूक शाखा माणगांव पोलीस रायगड जिल्हा “ कोरोना योद्धा “ म्हणून सन्मान पत्र बाहाल करण्यात आला.यात वरील सर्व कार्यकारी मंडळी यांच्या सहीने देण्यात आल्याचा माहिती प्रतिनिधीस वाहतूक शाखा कार्यलयात निदर्शनास आले.
 
या प्रशस्ती सन्मान पत्रा मध्ये माणगांव वाहतूक पोलीस यांचे विशेष कौतुक देशातील कोविड-19,(कोरोना)प्रधुरभावच्या कठीण काळात आपण स्वतःच्या जीवाची व कुटुंबियाची पर्वा न करता समाजा करिता आहोरात्र मेहनत करून समाजाच्या बिक्कट संकटमय काळात आपण सर्वजण समाजाचे रक्षण करीत सेवा पुरवीत आहात, आपले सामाजिक मान व समाजाप्रती असलेली बांधिलकी पाळत जबाबदारी व कर्तव्यध्यक्ष तात्परतेने केलेले कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. आपल्या हया कार्याची दाखल घेत “ कोविड योद्धा “ म्हणून आदरपूर्वक सन्मान करण्यात येत आहे. पुढे ‘साप्ताहिक पोलीस तपास’ परिवारतर्फे सलाम व अपनासर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन म्हणून विशेष उल्लेख करून गौरविण्यात आले आहे.
 
माणगांव वाहतूक पोलीस यांचे “कोरोना योद्धा “ म्हणून सन्मान पत्र मिळालेल्याचा माहिती समस्थ माणगांव शहर तसेच तालुका सह सर्वानि अभिनंदनचा वर्षाव केले आहे तसेच माणगांव पोलीसचा एका सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीला या सन्मान पत्र मध्ये माणगांव वाहतूक पोलीस यांचा जो अवर्जून कौतुक ओळी जे नमूद करण्यात आले आहे. ते पाहून आम्हाला अत्यानंद झाला आहे म्हणून आपला मत व्यक्त केले.