लघुपाटबंधारेच्या बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीच्या प्रकल्पास 25.21 कोटी रु. ची प्रशासकिय मंजुरी

जनदूत टिम    05-May-2021
Total Views |
मालेगांव : बोरी-अंबेदरी व दहिकुटे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांऐवजी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीच्या विशेष दुरुस्ती प्रकल्पास 25.21 कोटी रु. ची प्रशासकिय मान्यता मिळाली असे भुसे यांनी कळविले आहे.
 
Dadaji Bhuse_1  
 
मालेगांव तालुक्यातील टिंगरी गावाजवळ 1992 साली बोरी नदीवर बोरी-आंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्प तर दहिकुटे गावाजवळ 1975 साली कान्हेरी नदीवर दहिकुटे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या माती धरणाचे काम करण्यात आले. बोरी - अंबेदरी धरणाचा एकुण पाणीसाठा 3.54 द.ल.घ.मी. तर दहिकुटे धरणाचा एकुण पाणीसाठी 3.57 द.ल.घ.मी. इतका आहे.
 
बोरी-अंबेदरी प्रकल्पाअंतर्गत झोडगे, अस्ताणे, जळकु, वनपट, लखाणे, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी, हरणशिकार या गावातील एकुण 910 हे. सिंचन क्षेत्र तर दहिकुटे प्रकल्पाअंतर्गत देवारपाडे, जळकु, झोडगे, चिखलओहोळ, दसाणे, दहिकुटे, माणके, सायने खु. या भागातील एकुण 648 हे. इतके सिंचन क्षेत्र आहे. या दोन्ही धरणांचे कालवे खडकाळ व मुरमाड जमिनीतुन जात असल्यामुळे 80 ते 90 टक्के पाणी वाया जात असल्यामुळे परिणामी दोन्ही धरणांचे सिंचन क्षेत्र कमी होवुन कालव्याच्या शेवटच्या भागातील क्षेत्र सिंचनापासुन वंचित राहत होते.
 
त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाच्या कालव्यांद्वारे होणारी पाण्याची गळती रोखुन शेवटच्या भागापर्यंत पाणी पोचुन सिंचन क्षेत्राची पुर्नस्थापना कण्यासाठी बंदिस्त नलिका प्रणाली हा विशेष महत्वाकांक्षी प्रकल्प ना. भुसे यांनी हाती घेतला आहे. बोरी-अंबेदरी लघुपाटबंधारे या प्रकल्पाच्या 11 कि.मी. व झोडगे येथील 7 कि.मी. मध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणेसाठी विशेष दुरुस्तीकामास 17.85 कोटी रु.व दहिकुटे उजवा कालवा बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणेकामी 7.36 कोटी रु. किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता मिळाली आहे असे ना. भुसे यांनी सांगीतले. बंदिस्त नलिकेद्वारे पाणी वाहुन नेले जाणार असल्याने आवर्तनकाळात पाण्याची गळती थांबल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होवुन शेतकऱ्यांना सिंचन क्षेत्राचा लाभ मिळणार आहे.