साक्षी दिघेयांनी नांदगाव येथे Co Vaccine लसीकरण केंद्र सुरू करण्याची केली मागणी

04 May 2021 13:49:17
पाली/गोमाशी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माजी सभापती साक्षी दिघे यांनी नांदगावला co vaccine लसीकरण केंद्र चालू करावे ही मागणी सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडे ता. 4 मे रोजी केली .

pali44_1  H x W 
 
नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांना co vaccine लसीकरणासाठी पाली येथे तालुका आरोग्य केंद्रात रात्री 12 वाजता यावे लागते. त्यामूळे नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होते यावर सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी असे सांगितले की तुमची मागणी योग्य आहे. त्याचा विचार करून लवकरच नांदगावला लसीकरण केंद्र सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय कमी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश बुरुमकर देखील उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0