वैतरणा नदीच्या पुला खालून नौकानयनावर बंदी

जनदूत टिम    04-May-2021
Total Views |
पालघर : रेल्वे ब्रिज क्र. 93 च्या कार्यक्षेत्रामध्ये व त्यांच्या पोहोच मार्गामधील रेती उत्खन्न व नौकानयन मार्ग वाहतूकीसाठी बंद करणे आवश्यक आहे. उपोदघातातील अनुक्रमांक 2 वर अंतर्भूत असलेल्या पत्रान्वये मुख्य ब्रिज अभियंता यांनी पश्चिम रेल्वेवरील सदर ब्रिज बाबतचे महत्व व रेल्वे ब्रिज बाबतचा संभाव्य धोका उदभवल्यास होणारे परिणाम टाळता येणार आहेत.
 
94_big_1  H x W
 
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 20 अन्वये सर्व सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि मार्ग, पुल, खंदक, धरणे आणि त्यांच्या वरील किंवा त्यांच्या बाजूंची कुंपणे आणि पूर्ण भरतीच्या पाण्याच्या खुणेच्या खालील समुद्राचा, बंदराचा व खाडयांचा आणि नदया, ओहोळ, नाले, सरोवर व तळी आणि सर्व कालवे व पाण्याचे पाट आणि साचलेले सर्व पाणी व वाहते पाणी इत्यादी वर राज्य शासनाचा मालकी हक्क्‍ आहे. रेल्वे ब्रिज क्र.93 च्या कार्यक्षेत्रातील रोडचा वापर रेती वाहतूक ट्रकसाठी प्रतिबंधित केला आहे. पोलीस अधीक्षक पालघर यांनी वैतरणा नदीवरील रेल्वे ब्रिज व इतर ब्रिजच्या 600 मीटर कार्यक्षेत्रात 24 X 7 पोलीस गस्त्‍ ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस 600 मीटर ( 2000 फुट ) च्या क्षेत्रात रेती उत्खननास परवानगी देणेत आलेली नाही.
 
अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) व (3) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30 व 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून वैतरणा नदीवरील रेल्वेपुलाच्या (पुल क्र. 93) दोन्ही बाजूस 2 कि.मी. कार्यक्षेत्रात दि.04 मे 2021 रोजी 00.01 वा.पासून ते दि. 01 जूलै 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत पेालीस विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, नौदल, मत्स्य व्यवसाय, वन, कोस्ट गार्ड, उत्पादन शुल्क इत्यादी शासकीय विभाग वगळून इतर सर्व व्यक्तींना वैतरणा नदीवरील रेल्वेपुलाच्या (पुल क्र. 93) दोन्ही बाजूस 2 कि.मी. परिसरात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर यांचे पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारे नौकानयन मार्गाचा वापर करणेस मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.