खरीप हंगामासाठी सुधागड कृषी विभागाकडून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

28 May 2021 13:42:02
पाली/गोमाशी:सुधागड कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी जे. बी.झगडे व मंडळ कृषी अधिकारी व्ही. एल. माने ,तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी गावोगावी जाऊन खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत.
खरीप हंगामाच्या तयारीसाठी भात बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. हे प्रात्यक्षिक नुकतेच गोमाशी येथे कृषी सहाय्यक व पर्यवेक्षक मारुती आढाव ,कृषी सहाय्यीका रेश्मा लबडे यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आले. अशा प्रकारची प्रात्यक्षिके अडुलसे, पाच्छापूर,कोशिबळे ,कळंबोशी या गावामधून देखील घेण्यात आली.

pali44_1  H x W
 
रोहिणी पंधरवडा अंतर्गत कृषी विभागाकडून गावोगावी बैठकीचे आयोजन करून भात बियाणे बीज प्रक्रिया ,भात बियाणे उगवण व क्षमता चाचणी अशी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या समोर घेण्यात आली .या प्रक्रियेमुळे अत्यंत कमी खर्चात पेरणी करीता घरगुती बियाणे वापरणे शक्य होते. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मजुरीमुळे भात शेती करणे परवडत नाहीं जर शेतकऱ्याने या पद्धतीने बीजप्रक्रिया केली तर 3 वर्ष घरगुती बियाणे वापरू शकता असें कृषी सहाय्यक आडाव यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा १ जुलै ते ३१ जुलै या वेळेत काढण्याचे आवाहन आडाव यांनी केले. शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावर बियाणे खरेदी केली असतील तरी ते बियाणे चांगले आहे का ते बीजप्रक्रिया प्रत्यक्षिकाद्वारे बगून पेरणी करू शकतो . त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत आणि खर्च वाया जाणार नाही असे कृषी सहाय्यीका रेश्मा लबडे यांनी सांगितले. चालू हंगामात शेतकऱ्यांना फळबागा करिता म.ग्रा.रो.ह.यो.फळबाग लागवड योजनेची माहिती दिली तसेच महाडीबीटी या पोर्टलवर फळबाग योजनेची माहिती भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना दिले.
कोरोना काळात या बीजप्रक्रियाचा शेतकऱ्यांनी वापर केला तर खर्चात बचत होऊन उत्पादन देखील भरघोस येईल.
- शेतकरी मुरलीधर सुतार
शेतकऱ्यांनी कृषी विभागाला संपर्क करून खत बियाणे या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच बियाणे पेरल्यानंतर त्याची पिशवी, भात, आणि टॅग जपून ठेवावे.
- कृषी पर्यवेक्षक मारुती आडाव

Powered By Sangraha 9.0