आपली सुरक्षा आपल्याच हाती!

24 May 2021 21:18:31
करोना सारखे महासंकट घोंगावत असताना, मास्क हा करोना संसर्गाला अटकाव करणारा, मूलभूत आणि प्राथमिक सुरक्षतेचा एक मार्ग आहे परंतु देशातील पन्नास टक्के देशवासीय मास्कचा वापर करीत नाहीत अस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या इंडिया पॉईंट्स करोना या ट्विटर हॅंडलवर प्रसारित केलय.

pandit88_1  H x 
 
हे अत्यंत गंभीर तर आहेच, शिवाय करोना संसर्गाला वाव देणारी ठरू शकते हे का लक्षात घेतलं जात नाही खर म्हणजे हीच तर अधिक संकटात टाकणारी बाब होऊ शकते. हे आमच्या, आमच्या देशवासीयांच्या ध्यानी का येत नाही ? असच दुर्दैवाने म्हणावे लागतय. शासन आपल्या परीने नियम, नियमावली द्वारे सुरक्षतेचे मार्ग दाखवीत असते परंतु त्याची काटेकोर अमलबजावणी स्वतालाच करावयास हवी स्व:तासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी जागरूकपणे, दक्षतेने. बर, उरलेल्या पन्नास टक्क्यापैकी बहुतांशजन मास्क हनुवटीवर, नाकाखाली तर केवळ गळ्यात अडकवलेले आढळताना पाहण्यात येतात अशाने ही भयंकर शृंखला तुटणार कशी ? केंव्हा ? कधी ? ती जर तोडायची असेल तर प्रत्येकाने सुरक्षेच्या प्रत्येक आयुधांचा, नियमांचा काटेकोर वापर करावयास हवा. ती सुद्धा एक समाजसेवाच आहे असे विचार जेष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांनी मांडले.
Powered By Sangraha 9.0