दहावीची परीक्षा का नाही? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

जनदूत टिम    21-May-2021
Total Views |
मुंबई : कोरोनाचा संसर्ग पाहता राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, त्यांना कशाच्या आधारावर गुण द्यायचे याबद्दल शिक्षण विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही याची दखल घेत हायकोर्टाने दहावीची परीक्षा कधी घेणार असा सवाल राज्य सरकारला विचारला तसेच कोरोनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडवू नका, असेही प्रशासनाला सुनावले.
 
Student0254_1  
 
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरू नये तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत यासाठी दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करत पुण्यातील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात अॅड. उदय वारुंजीकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली.
 
विद्यार्थ्यांचे नुकसान होईल
सुनावणीवेळी उदाहरण देताना न्यायमूर्ती काथावाला यांनी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले. न्यायमूर्ती म्हणाले, गेल्या” वर्षी पास झालेल्या विधी शाखेच्या मुलांना -९० ते ९२ टक्के गुण मिळाले आहेत, असे घडत राहिले तर शिक्षणाचा दर्जा घसरेल. व विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत.
राज्याची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकील प्रियभूषण काकडे - यांना खंडपीठाने जाब विचारला... 
न्यायमूर्ती म्हणाले की दहावीच्या | रद्द केलेल्या परीक्षा शिक्षण विभाग पुढे घेणार आहे की नाही, परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना सरकार प्रमोट करणार आहे का?
दहावी हे शालेय शिक्षणात सर्वात महत्त्वाचं वर्ष असताना परीक्षा रद्द करण्याचा शिक्षण विभागाने कसा काय निर्णय घेतला?
एवढेच काय तर एकीकडे तुम्ही दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करता, आणि बारावीची परीक्षा घेता यातून शासनाला काय साध्य करायचे आहे?