भिवंडी ग्रामीणमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, वडघर येथील शिवमंदिरात चोरी

21 May 2021 15:29:52
भिवंडी : चोरट्यांनी वस्तू व दागिने चोरण्यासाठी मंदिरातील देवालाही सोडलं नाही. अशीच एक घटना भिवंडी ग्रामीणमधील वडघर येथील श्री कालिकामाता मंदिर व शिवमंदिर या दोन मंदिरांमध्ये चोरी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजता घडली आहे.
 
Thief_1  H x W:
 
दरम्यान चोरटे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, याप्रकरणी गावकऱ्यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वडघर येथील श्री कालिकामाता मंदिरात रिक्षाने आलेल्या दोन चोरट्यांनी मंदिरातील साहित्याची चोरी केली आहे. त्याचबरोबर याच मंदिराच्या पाठीमागे थोड्या अंतरावर असलेल्या शंकर मंदिरात देखील चोरट्यांनी चोरी केली आहे. या दोन्ही मंदिरातील तांब्याच्या महागड्या समयी, घंटा व इतर साहित्य दोन चोरट्यांनी चोरी करून नेले आहेत.
 
दरम्यान ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिस यंत्रणेने या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0