अॅट्रॉसिटीच्या तक्रारीद्वारे कोणताही दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही!

जनदूत टिम    21-May-2021
Total Views |

  • परमबीर यांच्या याचिकेविरोधात पोलीस निरीक्षकाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई : अॅट्रॉसिटीच्या तक्रारीद्वारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा आपला प्रयत्न नाही, असे प्रतिज्ञापत्र पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी हायकोर्टात सादर केले आहे. तसेच परमबीर यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात केलेल्या याचिकेलाही त्यांनी विरोध केला आहे.
 
mcms_1  H x W:
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर । सिंह व काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध । ‘अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलीस निरीक्षक भीमराव । घाडगे यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा गुन्हा ठाणे येथे वर्ग करण्यात आला. एफआयआर रद्द करण्यासाठी तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार निदर्शनास आणणारे पत्र मागे घेण्यासाठी सरकारकडून माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत परमबीर सिंह यांनी याचिका दाखल केली. या याचिकेप्रकरणी पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी
 
अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेले आरोप मागे घेण्यासाठी आपण दबाव टाकत नाही. सिंह यांनी संपूर्ण कारकीर्दीत भ्रष्टाचार - करून पोलीस दलाची बदनामी केली आहे, तसेच परमबीर यांनी १०० कोटींच्या खंडणीचा केलेला दावा काल्पनिक आहे. । एफआयआर नोंदवल्याबद्दल परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना या तक्रारीबाबत पत्र लिहिले, मात्र ही तक्रार निराधार आहे. माजी गृहमंत्री - अनिल देशमुख किंवा पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात केवळ गैरवर्तन केल्याचा आरोप करून परमबीर त्यांना बदनाम करू शकत नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मानसिक छळ
परमबीर यांनी केवळ माझ्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले नाहीत तर केवळ पाच बेकायदेशीर खटल्यांमध्ये खोटे आरोप करून माझा अपमान केला व मानसिक छळ केला आहे. कारण मी त्यांच्या बेकायदेशीर आदेशांचे पालन करण्यास नकार दिला होता, असे घाडगे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.