हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या मागणीला यश!

जनदूत टिम    20-May-2021
Total Views |
मुंबई : केंद्र सरकारने केलेली अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घ्यावी यासाठी खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब त्यांच्या सहकाऱ्यांसह सतत प्रयत्नशील होतो. त्यासाठी देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व खत व रसायन मंत्री डी. व्ही. गौडा यांना पत्रव्यवहार केला, एकीकडे बळीराजा साठी घोषणा करायच्या आणि दरवाढ करायची हे अत्यंत चुकीचे आहे व त्याबाबत आवाज उठवला.

Hemant_patil_1   
 
या मागणीनुसार केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडाजी व केंद्र सरकारने सबसिडी 500 रुपयांवरून वाढवून 1200 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे खतांची किंमत कमी होण्यास मदत होणार आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे व कोरोनाच्या कठीण काळात आधार देणारा आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. जनतेवर होणारा अन्याय कधीच सहन करून घेणार नाही व जनहितासाठी सदैव कटिबद्ध राहील.