जिप सदस्य प्रकाश निकम यांच्या कडून कोरोना केंद्रास वस्तूंचे वाटप , कोरोना योध्दांचा सन्मान

पारस सहाणे    20-May-2021
Total Views |
जव्हार : पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश निकम व त्यांच्या पत्नी व मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम यांच्या वाढदिवसानिमित्त जव्हार येथील कोरोना काळजी केंद्रातील रुग्णांना फळं व सुक्यामेवाचे वाटप करण्यात आले तसेच डॉक्टर, नर्स,तसेच वार्डबॉय व कोरोना युद्धात स्वखुशीने काम करणारे परेश पटेल, साजिद सय्यद, राजु रीडलानी प्रशांत तेजे यांचा छत्रपती शिवराय यांची प्रतिमा भेट भेऊन सत्कार करण्यात आला.

sanman445_1  H  
 
यावेळी प्रकाश निकम, सारिका निकम, जव्हार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण पाटील,मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय लोहार, डॉ.हेमाली पाटील ,नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल ,शिवसेना जव्हार शहरप्रमुख परेश पटेल, गजानन सहाणे, नितिन तामोरे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.