पोलीस मित्र संघटनेकडून कर्जत पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

19 May 2021 15:18:18
नेरळ : स्वराज पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
 
polic88_1  H x
 
कोरोना च्या काळात पोलीस बांधवांनी स्वतःचा जीवाशी खेळत जनतेची सुरक्षा केली आहे. परंतु त्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे या अनुषंगाने पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, महासचिव कमलेश शेवाळे, प्रदेशाध्यक्ष अमर बेंद्रे, पोलीस मित्र प्रदेशाध्यक्ष वजीर शेख यांच्या नेतृत्वाखाली व संपर्क प्रमुख कौसर भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले.
 
यावेळी पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील, सचिव प्रितेश बोंबे, सहसचिव दीपक कडव, संपर्क प्रमुख निखिल सुर्वे, कर्जत तालुका उपाध्यक्ष भूषण कडू, सचिव संदेश काळभोर, सचिन धुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0