श्रद्धांजली

डाॅ.दिलीप धानके    14-May-2021
Total Views |
 
pexels-photo-459622_1&nbs
 
प्रेतावरी फुलांची ओंजळ कशाला।
मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥
जिवंतपणी गुण गायचे राहूनच गेले
कफणास आता तुमचे वंदन कशाला।
मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥
रात्रंदिन सजवल्या द्वेषाच्या मैफीली
तुमच्या हाती तो पुष्पहार कशाला।
मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥
जिवंतपणी यातनांच्या डागण्या किती
आता तो अश्रूंचा अभिषेक कशाला।
मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥
तेव्हा माणुसकीचे कुंपन बंद होते
मग मढयास अमृताचे शिंपन कशाला।
मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥
तेव्हा सारेच हात अदुष्य होतात कुठे
तिरडीस मग नाटकी खांदा कशाला।
मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥
जिवंतपणीच मी अनेकदा मेलो होतो
अरे पुन्हा तुला माझे सुतक कशाला।
मेल्यावरी माणसाचे कौतुक कशाला॥