कोरोना काळात पडघ्यात राजकारणाला ऊत!!

जनदूत टिम    11-May-2021
Total Views |
शहापूर : भारत देशासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून पडघा गावाचे सरपंच श्री अमोल सुधाकर बिडवी यांचे विरोधात काही विघ्नसंतोषी लोक परिस्थितीचे राजकारण करण्यात व्यग्र असल्याचे दिसून येते. पडघा गावात सोडियम हायपोक्लोराईड ची नियमीत फवारणी होत असल्याने व पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या दंडात्मक कारवाई मूळे कोविड रुग्णांची संख्या वाढीस प्रतिबंध झाला आहे.
 
padgha44_1  H x
 
परंतु काही हितचिंतकांकडे सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव असल्याने त्यांच्या डोळ्याने ते त्यांना दिसत नाही यात सरपंच श्री अमोल बिडवी यांचा काय तो दोष ? पडघा परिसराचा विचार करता पडघा हे मध्यवर्ती व बाजारहाट चे ठिकाण असूनही पडघा गावाचा भिवंडी तालुक्याचा तुलनात्मक विचार करता कोरोना रुग्णांची संख्या बर्यापैकी आटोक्यात आहे. बाजारपेठेतील गर्दीवर सुद्धा सरपंचांनी रामबाण उपाय योजला असून बाजारपेठेत दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनावर सुद्धा त्यांची बारीक नजर आहे.
 
आज सरपंच अमोल बिडवी यांनी उपसरपंच अभिषेक नागावेकर,ग्रा. प.सदस्य शैलेश बिडवी, रविंद्र विशे व इतर ग्रा. प. सदस्य व व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री दिनेश गंधे व्यापारी मंडळाचे सदस्य श्री गिरीश पटेल, भरत ठक्कर व इतर छोटेमोठे व्यावसायिक यांच्यासह पोलिस निरीक्षक कटके साहेब यांची भेट घेतली. त्यावेळी कटके साहेबानी सांगितले की कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येईल,या भूमिकेस व्यापारी मंडळानेही सहमती दर्शविली असून तशी वेळ येणार नसल्याची ग्वाही दिली.