तीच जाण यातना देणार !

- विश्वनाथ पंडित, ठाणे    08-Apr-2021
Total Views |
राजस्थानची नव्हे तर देशाची उदयोन्मुख कुस्तीपटू रितीका फोगटच जाण मनाला चटका लावून गेल. राज्य स्तरावरील अंतिम सामन्यात केवळ एक गुणाने झालेला पराभव तिने जिव्हारी लावून घेतला, निराशेपोटी तीन उचललेल पाऊल यातना देणार आहेच शिवाय गंभीरपणे विचार करावयास लावणारेही आहे.
 
ritika0256_1  H
 
कारण ही मन कोवळी असतात, अनुभव शून्य असतो फक्त स्वप्न आणि आपला एखादा आदर्श नजरेसमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू होते आणि शक्य तितक्या लवकर ध्येय गाठण्याची त्यांची धडपड असते, मला फक्त यश आणि यशचं मिळालं पाहिजे, मला फक्त जिंकणच ठाऊक आहे अशी मनोधारना त्यांच्यात नकळत निर्माण होत असतानाच अशाचवेळी जय पराजय हे खेळात आणि खेळाडूच्या जीवनात अविभाज्य भाग असतात, पराजय हा अंतिम असतोच असे नाही आणि जय सहजगत्या, जलद गतीने मिळतो असेही नाही, ते ज्यांना आदर्श मानतात त्यांनीही खूप यश अपयश अनुभवलेले असतात, त्यांनाही खूप मेहनत केल्यावरच यश प्राप्त झालेले आहे.
 
अशी शिकवण या कोवळ्या जीवांना मग तो कोणत्याही खेळातील खेळाडू असो सुरुवातीपासूनच खेळाबरोबरच त्यांच्या प्रशिक्षकांनी, माता पित्यानी, जेष्ठ क्रीडपटूनी समुपदेशातून अग्रक्रमाने वारंवार देणे गरजेचे वाटते, त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे, त्यांची मन घट्ट आणि जय पराजय सहज पचविण्या इतपत कठोर केली गेली पाहिजेत ही काळाची गरज आहे.