गोठेघर येथे कोविड केअर सेंटर सुरू

जनदूत टिम    08-Apr-2021
Total Views |
शहापूर : शहापूर तालुक्यात गोठेघर (वाफे)येथील आश्रमशाळा येथे कालपासून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.आज ठाणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती मा.कुंदनजी पाटील साहेब यांनी मा.आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब व इतर मान्यवर गटविकास अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सेंटर ची पहाणी केली.
 
goteghar0256_1  
 
शहापूर कोविड सेंटर मध्ये कोविड रुग्णांना आणण्यासाठी किंवा पुढील उपचारासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन उपलब्ध नसल्याने,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शहापूर तालुक्यासाठी मिळालेली रुग्णवाहिका आज शहापूर कोविड सेंटरसाठी उद्घाटन करून आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.
 
यावेळी उपजिल्हा प्रमुख शंकरजी खाडे, तालुकाप्रमुख मारुतीजी धिर्डे, जेष्ठ नेते काशिनाथजी तिवरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती संजयजी निमसे,आकाशजी सावंत,संतोष शिंदे,जि.प.सदस्य वंदनाताई भांडे,सभापती रेश्मा मेमाणे, प.स.सदस्य पद्माकर वेखंडे, संदीप थोराड,नयन वेखंडे,कोरडे ताई,आप्पा बेंडकुळे,अरुनजी कासार,निलेश भांडे,विलास गगे,सुरेंद्र तेलवणे,मिलिंद देशमुख,शिवतेज सावंत,शंकर भगत,शरद वेखंडे,संतोष लहाने,पृथ्वी अधिकारी, धीरज झुगरे,आदी मान्यवर उपस्थित होते.