झटका आला की लॉकडाऊन करणार हे सरकारचे धोरण

जनदूत टिम    04-Apr-2021
Total Views |

  • जव्हार मधील सार्वजनिक बांधकाम, आदिवासी, ग्रामविकास, जलसंधारण विभागाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
  • एन आय आयमुळे सचिन वाझेचे प्रकरण जनतेसमोर आले
  • त्या आदिवासी कुटूंबाला पाच लाखांची भाजपा मदत करणार प्रवीण दरेकर यांचे जव्हार येथे प्रतिपादन

जव्हार : मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथील आदिवासी समाजाचे येथील अनंता मौळे यांच्या घराला भीषण आग लागून २ मुलं व पत्नी आई असे आगीत मृत्युमुखी पडले. सदर मौळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत आमदार मनीषा चौधरी, भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील ,पदाधिकारी,कार्यकर्ते ,तहसीलदार व पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

pravin0002_1  H 
 
जव्हार येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितले की, मौळे यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला असता डोळ्यादेखत पोटाची दोन मुलं आगीत भस्मसात होणं त्याचबरोबर स्वतःची सदाचरणी असलेली पत्नी या आगीत मृत्युमुखी पडणे स्वतःची आई यापेक्षा भीषण दुर्दैव दुसरा असू शकत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की या प्रसंगात झाल्यावर सरकार म्हणून येऊन त्या ठिकाणी आधार देण्याची आवश्यकता होती पैसे आर्थिक मदत भले चार दिवस उशीर झाला तरी समजू शकतो परंतु या जेव्हा अशा प्रकारचे संकट कुटुंबावर येऊन गेले परंतु त्यांना ज्या मदतीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत तहसीलदारांशी या ठिकाणी बोललो तर अशा प्रकारचे कुठलेही प्रस्ताव याठिकाणी शासनाने केलेले नाही कदाचित शासनाच्या निकषांमध्ये अशा प्रकारच्या आगीत मृत्युमुखीना मदत देण्याचे प्रावधान नसेल परंतु शेवटी जेव्हा दोन घरातली मुलं जातात पत्नी आई जाते त्यावेळेला निकषाच्या बाहेर येऊन चौकटीच्या बाहेर येऊन मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून मी राज्य सरकारकडे मागणी करतो आपल्या माध्यमातून या कुटुंबाचा व्यवसाय उध्वस्त झालेले आहे. त्यांच्यावर ट्रॅक्टरचा तीन लाखाचं कर्ज आहे. त्याशिवाय व्यापाऱ्यांकडून माला निमित्त घेतले कर्ज असो दुसऱ्या बाजूला मुलगी , मातोश्री पत्नी गेले अशा वेळेला त्याला आधार देण्याची आवश्यकता आहे.
 
मी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवा मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो. आदिवासी कुटुंबाला साथ देण्याची गरज आहे, त्यांच्या मागेच निश्चितपणे भारतीय जनता पक्ष उभा आहे. त्यासाठी भाजपच्या वतीने पाच लाखांची मदत दरेकर यांनी जाहीर केली व मौळे यांनी विनंती केल्यानुसार बाहेरून कोणीतरी कडी लावली होती यासाठी पुन्हा तपास करण्यात यावा यासाठी मोखाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत असे ही त्यांनी सांगितले.
 
सरकारला झटका येईल तेव्हा लॉनडाऊन-
महाराष्ट्र सरकारला झटका आला की लॉकडाऊनची घोषणा केली जाते. सरसकट लॉकडाऊन त्या ठिकाणी करू नये कारण लोकं कुठेतरी आता स्थिरावत आहेत आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडत आहेत आणि आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन केले तर लोक उपासमारीने मरतील आणि म्हणून तुम्हाला लॉकडाऊन करायचा असेल तर त्याच्या अकाउंट मध्ये पहिले पाच हजार रुपये टाका आणि करा आमच्या या भूमिकेला पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे गर्दी मध्ये जातांना लॉकडाउन करण्यापेक्षा नियमावली कडक करण्यात येणे आवश्यक आहे.
 
एन आय ए सचिन वाझेचे अंतिम सत्य समोर आणेल
सचिन वाझे प्रकरणाची सखोल माहिती जनतेसमोर यावी यासाठी मागणी आम्ही केली त्या वेळेला मी राजकीय अभिनिवेश मध्ये बोलतोय अशा प्रकारचं सांगितले गेलो होतो परंतु त्याच्यामध्ये तपास झाल्यानंतर नदी मध्ये असणारे पुरावे सापडतात, कार सापडतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं आज हा विषय का अंतिम टप्प्यापर्यंत येईल असा न्यायालयाच्या माध्यमातून विश्वास आहे आणि तशा प्रकारचा तपास गती घेताना दिसतोय राष्ट्रीय तपास संस्था सर्व सत्य समोर आणेल.
 
भ्रष्टाचाराबाबतीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
आदिवासी विभागाच्या अंतर्गत,जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आणि ग्राम विकास आणि जलसंधारण या विभागात एकाच कामावर चार ते पाच वेळा बोगस बिले काढून आदिवासी समाजाच्या विकासासाठी आलेल्या निधिचा अपहार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे.
 
वाडा जव्हार मोखाडा या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासी समाजाच्या विकासासाठी आलेला निधी मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यासाठी मी विरोधी पक्षनेते म्हणून आवाज उठवणार आहे. मला वाटतं कंत्राटदारांचा उखळ पांढरे करण्याचे काम या ठिकाणी जास्त होताना दिसत आहे आणि या सगळ्या विषयाची तपशीलवार सखोल चौकशी करावी यासाठी उद्याच मुख्यमंत्री यांच्या कडे पत्राद्वारे मागणी करणार आहे.