खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते नव्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन

30 Apr 2021 12:26:06

  • मुंबईकरांना एक सुलभ, न्याय आणि सुरक्षित लसीकरणाची संधी उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न

मुंबई : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आज मा. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते मुलुंड वेस्टच्या इएसआयएस (ESIS) हॉस्पिटल येथे एक नवीन लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. खासदार मनोज कोटक यांनी लसीकरणासाठी आलेल्या वृद्ध लोकांशी संवाद साधला. तसेच लसीकरण मोहीम हाताळणारे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांशी चर्चा केली. यासह लसीकरणाच्या सर्व तयारीची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि यशस्वी लसीकरण कार्यक्रमासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या.

kotak44_1  H x
 
सर्व मुंबईकरांना एक सुलभ, न्याय आणि सुरक्षित लसीकरणाची संधी उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. लसीकरण केल्याने लोकांचे प्राण वाचू शकतात, लसीकरणासाठी स्वतःची नोंदणी करा (https://www.cowin.gov.in/home) यशस्वी लसीकरण मोहिमेने आपण सगळे कोरोनाला पराभूत करू, असे मनोज कोटक म्हणाले. याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक प्रभाकर शिंदे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका समिता कांबळे आणि भाजपा कार्यकर्ता व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0