जव्हारच्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य नागरिकांना जडले श्वासाचे आजार

पारस सहाणे    28-Apr-2021
Total Views |

  • शहरातील रस्त्याची लावली वाट

जव्हार : जव्हार शहराला होणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरोत्थान महाअभियान अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जव्हार नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने सुमारे १७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून जव्हार तालुक्यातील खडखड या धरणातून जव्हार शहराला पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे त्यासाठी मे.ऐ. आर. घुले या कंपनीला ठेका देण्यात आला आहे.
 
javha44_1  H x
 
सदर नळ पाणी पाणीपुरवठा योजनेसाठी जव्हार शहरातून जमिनीखालून पाईपलाईन टाकली जात आहेत त्यासाठी बुलडोजर च्या साह्याने रस्ते खोदली जात आहेत सदर कामामुळे प्रचंड प्रमाणात माती रस्त्यावर पसरली आहे तसेच मोठे दगड रस्त्यावरच टाकून देण्यात आले आहेत. मातीमधून उडणारी धुळीचे प्रमाण खूप असून धुळीमुळे जव्हारच्या नागरिकांना सर्दी खोकला तसेच श्वसनाचे विकार जडले आहेत. एकीकडे कोरोना विषाणू मुळे सर्दी खोकला ही प्राथमिक लक्षणे दिसतात त्यामुळे धुळीमुळे सर्दी-खोकला होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत, श्वासाचे आजाराचा त्रास होत आहे.
 
javhar44_1  H x
 
मातीवर पाणी मारणे व रोलिंग करण्यात येईल असे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी स्पष्ट केले होते मात्र त्यावर काही कारवाई होतांना दिसत नाही. नगरपरिषदेला यासाठी उपाययोजना करण्यासाठी नागरीकांनी विनंती केली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रस्त्यावर मोठेमोठे दगड ,पाईप व माती आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे मात्र ठेकेदार कोणालाही जुमानत नसल्याचे स्पष्ट दिसते. रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले असून, मागच्या वर्षीच केलेले रस्ते खराब झाले आहेत, रस्त्यावर आलेली दगड माती व पाईप यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून, वाहतूक कोंडी होत आहे. खडखड धरणातुन जव्हार शहराला पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून जव्हार शहरातील इतिहासातील सर्वात महागडे विकास काम असलेले नळ पाणीपुरवठा योजना सुमारे १७ कोटी रुपये खर्चून कार्यान्वित करण्यात येणार असून जमिनी खालील पाईपलाईन टाकली जात आहे सदर कामावर गेल्या काही महिन्यापूर्वी काही नगरसेवक तसेच इतर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते व कामाचा दर्जा सुमार असल्याचे बोलले जात आहे. सर्वकाही अर्थकारणात दडपलेले असून, मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली असावी असे जाणकार नागरिक म्हणत आहेत. युवा सेनेने यावर आवाज उठवला असून नगरपरिषदेला ठेकेदार वर कारवाई करण्याबाबतीत निवेदन दिले आहे
खडखड धरणातून जव्हार शहराला निर्माण होत असलेल्या नळपाणी योजनेचे काम हे सुमार दर्जाचे असून, त्या कामाकडे कोणीही लक्ष देतांना दिसत नाही, मी या प्रकरणी वेळोवेळी तक्रार केली आहे.
वैभव अभ्यंकर, -नगरसेवक ,जव्हार नगरपरिषद, जव्हार
ठेकेदाराला योग्य त्या सूचना दिल्या असून, कोरोनाच्या काळात धुळीने आजार होऊ शकतात.निविदेत नमूद केल्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेकेदारास तातडीने समस्या सोडण्यासाठी सांगितले आहे.
- संतोष शिंदे, प्रभारी मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद,जव्हार