ग्रामपंचायत कासटवाडी अंतर्गत कोविड-19 नियंत्रण समितीची आढावा बैठक

पारस सहाणे    28-Apr-2021
Total Views |
जव्हार  : जव्हार तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरलेले असून कोरोनाने हातपाय पसरायला सुरवात केल्याचे दिसून येत आहे.ग्रुप ग्रामपंचायत कसटवाडी हद्दीतील कोविड-19 नियंत्रण समितीने आपल्या अंतर्गत येणाऱ्या महसुली गावांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने बैठकीत आयोजित करण्यात आल्या होत्या.

javhar44_1  H x 
 
या बैठकीमध्ये कोरोणा रोगा बद्दल ग्रामीण भागात असणाऱ्या भीती आणि गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न समिती कडून करण्यात आला.मौजे - जयेश्र्वर,रामनगर, कासटवाडी(चोंढीपाडा),हाडे, गरदवाडी,जांभळीचामाळ,गणेशनगर या ठिकाणी कोरोनाचा आढावा घेण्यात आला.प्रत्येक महसुली गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांसाठी विलागिकरण कक्षाची स्थापना केल्याची माहिती या वेळेस समिती कडून देण्यात आली. या बैठकी प्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र राऊत,समितीचे सचिव/ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे,स्थानिक शाळेचे शिक्षक,ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,स्थानिक आशा वर्कर,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.