राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी घेतला तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा

संजय गायकवाड    28-Apr-2021
Total Views |
कर्जत : कर्जत तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या व सुरू असलेले कोव्हीड लसीकरण या संदर्भात माहिती व सूचना करण्या संदर्भात रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती सुधाकर घारे यांनी घेतली पंचायत समिती अधिकारी व संबंधित कोव्हीड यंत्रणा यांची संयुक्त बैठक संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना ने थैमान घातले आसून आपले कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांस कडून वेळोवेळी कोरोना नियंत्रण करण्यासंदर्भात सूचना केल्या जात आहेत.
 
k00122_1  H x W
 
संपूर्ण देशभरात किंबहुना महाराष्टात शासनाच्या वतीने लसीकरण केले जात आहे. प्रथमतः 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात आली आहे. केंद्रसरकार व राज्यसरकार यांस कडून आता 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचं सुचविले असून, आपल्या कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांचे कश्या पद्धतीने लसीकरण करता येईल, त्यांस कोठे व कशी लस उपलब्ध होईल, लसीकरणसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये, माझ्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला लस भेटली पाहिजे या हेतूने सर्व अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुधाकर घारे यांच्याकडून आढावा घेतला.
 
सद्यस्थितीत कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय कर्जत, कशेळे ग्रामीण रुग्णायल, प्राथमिक आरोग्य केंद्र मोहिली, कडाव, नेरळ, आंबिवली, खांडस, कळंब याठिकाणी कोव्हीड लसीकरण सुरू आहे, तरी सद्यस्थितीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे, कोरोना नियंत्रण करण्यासाठी लसीकरण होणं अत्यंत गरजेचे आहे, शासनाने आता १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण घेण्यासाठी सांगितले असून आपल्या तालुक्यातील सदरील लसीकरण चालू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अगोदरच गर्दी होत आहे, आणि आता 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर मोठया प्रमाणात ताण येऊ शकतो व गर्दी होऊ शकते.
 
सदरील बैठकीमध्ये सुधाकर घारे यांसकडून तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जात आहे, परंतु सहा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत येत असलेल्या 32 उपकेंद्र या ठिकाणी लसीकरण केले जात नाही, जर लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी केले गेले तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना लस उपलब्ध होईल व गर्दी होणार नाही, नागरिकांना सुरक्षित पणे लस घेता येईल, तत्काळ सर्व अधिकारी यांस याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितले व सर्व ठिकाणी लसीकरण कसे सुरू करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. काही दिवसात सर्व ठिकाणी मोफत लसीकरण सुरू करण्यात येईल असे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधाकर घारे यांसकडून सूचित करण्यात आले.