नेवाळी येथे बसवलेल्या हायमास्टचे उदघाटन

संजय गायकवाड    26-Apr-2021
Total Views |
कर्जत : कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायत हद्दीतील मौजे- नेवाळी तर्फे वासरे गावामध्ये विकास कामांचा ओघ सुरूच आहे. रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून व जि. प. निधीतून 5 लक्ष रुपये खर्च करून मौजे नेवाळी येथे हायमास्ट बसविण्यात आले, या कामाचे उदघाटन ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाले.
 
nevali55_1  H x
 
वासरे विभागामध्ये विकासाची गंगा आणणारे सुधाकर घारे यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद निधीतून नेवाळी गावचे ग्रामस्थ केतन बेलोसे यांच्या प्रयत्नातून मौजे नेवाळी येथे हायमास्ट बसविणे या कामांकरिता 5 लक्ष निधी मंजूर करण्यात आला. संपूर्ण परिसरात आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण व्हावी व आपलं गाव संपूर्ण प्रकाशमय व्हावे या उद्दीष्टीने सुधाकर घारे यांच्याकडे गावामध्ये हायमास्ट बसविण्यासाठी ग्रामस्थांकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. दिलेला शब्द पुरे करणारे सुधाकर घारे यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून देऊन निधीतून संपूर्ण नेवाळी गाव व बौद्धवस्ती येथे चार हायमास्ट बसविण्यात आले असून संपूर्ण गाव प्रकाशमय झाले आहे, संपूर्ण गावामधील नागरिकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.
 
या हायमास्टच्या उदघाटन प्रसंगी ग्रामस्थ प्रकाश बुवा मालुसरे, भालचंद्र बेलोसे, मोहन लाड, भगवान कदम, केतन बेलोसे, प्रसाद लाड, महेंद्र ढोले, प्रकाश जाधव, संजय ढोले, सतीश ढोले, बाळाराम ढोले, प्रदीप लाड, प्रशांत महाडीक, प्रशांत मालुसरे, ज्ञानेश्वर कदम, विराज बेलोसे, पोलीस पाटील भाऊ सरोते, प्रशांत लाड, अनिकेत बेलोसे, सोनू ढोले, प्रफुल चंदनशिवे, चंकी चंदनशिवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.