कोरोनाच्या जागृतीसाठी आमदारांचा पुढाकार

पारस सहाणे    25-Apr-2021
Total Views |

  • जनजागृती साठी स्वखर्चाने दिली वाहने
  • लॉउडस्पीकर आणि बॅनरद्वारे केली जातेय जागृती

जव्हार : कोरोनाच्या महामारीत आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आपल्या आमदार निधीतून १२ रुग्णवाहिका मतदारसंघासाठी दिल्यानंतर विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी आता कोरोना विषयी जनजागृती व्हावी गावांगावात याबाबतची माहिती व्हावी जेणेकरून लोकांमध्ये कोरोनाबाबतचे लसीकरणाचे तसेचकोवीड चाचणीचे गैरसमज दुर व्हावेत यासाठी स्वखर्चातुन प्रत्येक जिल्हा परीषद गटात एक या प्रमाणे १५ वाहने देवून लाउडस्पीकर आणि बॅनर लावलेली वाहने जनजागृती करीत आहेत आमदारांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

sunil44_1  H x  
 
जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड या तालुक्यात ९० टक्क्याहून अधिक भाग ग्रामीण आहे आजहि ग्रामीण भागात अनेक आजार अंगावर काढले जातात तसेच लसीकरण कोवीड चाचणी याबाबतही अनेक गैरसमजातून उपचार वेळेवर होत नसल्याने जिकरीच्या रुग्णात वाढ होवून अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे मुळात लक्षणे कोणती आहेत ती दिसताच क्षणी चाचणी होणे आणि लागलीच उपचारही होणे गरजेचे आहे यामुळे रुग्ण दगावत नाही मात्र ग्रामीण भागात थातुर मातुर औषधे किंवा एखाद्या खासगी उपचारावरच अबलंबुन राहिल्याने जीव जाण्यापर्यंत या आजाराची तीव्रता वाढते अशा वेळी उपचार रुग्णवाहिका सक्षम आरोग्य यंत्रणा असण्याबरोबरच खऱ्या अर्थाने जनजागृती व्हायला हवी.
 
या उद्देशातून आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जेंव्हा आपल्याशी संवाद साधतो तेंव्हा खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जनजागृती होते यातून कोरोना वरती बोलीभाषेतील गाणी तसेच स्वतः आमदार भुसारा यांच्या आवाजातील आवाहन असे लाउडस्पीकर लावलेले तसेच घ्यावयाची काळजी कोरोनाची लक्षणे आणि त्यावरील उपचार याबाबतचे बॅनर या वाहनांना लावलेले आहेत याशिवाय जिल्हा परीषद गटा निहाय हि वाहने फिरत असल्याने याचा चांगलाच उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे फक्त निवडणूक आणि राजकारणापुरता प्रचार करणाऱ्या राजकीय नेत्यांना चपराक देत भूसारा यांनी स्वखर्चातुन अशी वाहने देवुन जो पर्यंत कोरोना कमी होत नाही गावांगावात जागृती होत नाही तो पर्यंत हि प्रचार वाहने सुरू राहणार आहेत भूसारा यांच्या या कामगिरी बद्दल प्रशासन आणि लोकांमधुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
आपल्या भागात कोरोना बाबत अजूनही खुप गैरसमज आहेत याशिवाय कोरोनाशी साम्य असलेली लक्षणे आढळली तरीही लोक घरीच उपचार करीत असल्याने मृत्यूचे प्रसंग ओढावत आहेत यामुळे वेळीच निदान आणि वेळेवर उपचार हा सगळ्यात चांगला निर्णय असून याबाबत जनजागृती होण्यासाठी मी ही प्रचार वाहने दिली असून याचा चांगला फायदा होत असून कोवीड निदान होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.माझे पुन्हा एकदा आवाहन आहे कि ताप सर्दी खोकला अंगदुखी चव जाणे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात जावून चाचणी करा आणि औषधे घ्या.
- सुनिल भुसारा, आमदार विक्रमगड विधानसभा