विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी - पालकमंत्री दादाजी भुसे

जनदूत टिम    23-Apr-2021
Total Views |

  • मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये
  • जखमींना एक लाख रुपयांची मदत
  • घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल

वसई : विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना एक लाखाची तातडीची मदत देण्यात येणार आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
 
nhuse1100_1  H
 
विरार येथील विजय वल्लभ आयसीयू कक्षाला रात्री 3:30 च्या सुमारास आग लागली पालकमंत्री भुसे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. या घटनेमध्ये दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.