भिवंडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व कुणबी समाज उन्नती मंडळाच्या सदस्यांनी सावाद येथील कॉव्हिडं सेन्टर ला भेट दिली

जनदूत टिम    20-Apr-2021
Total Views |
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूने मोठया प्रमाणावर शिरकाव केल्यानें ग्रामीण भागातील रुग्णांना भेट देणे अशक्य झाल आहे. प्रत्येक गाव-वाडीमध्ये रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी भिणार येथे कॉव्हिडं केअर सेंटर सुरू असून तेथे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजन ची गरज लागते अश्या रुग्णांना सावाद येथील कॉव्हिडं सेंटर मध्ये उपचारासाठी पाठवले जाते.
 
BHIWANDI7744120_1 &n
 
मात्र तीन आठवड्यापुर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याअधिकारी डॉ राजेश नार्वेकर, खासदार कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, व आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात ८०० बेड च्या कॉव्हिडं हॉस्पिटलचे उदघाटन केले आणि त्यांच्या बातम्या सुध्दा प्रसारित केल्या, मात्र प्रत्यक्ष हे कॉव्हिडं सेंटर मागील ४ दिवसापासून सुरू झाले असल्याने तेथे १५० रुग्ण ऍडमिट करू शकतो इतका ऑक्सिजन चा पुरवठा असल्याने तेथील डॉक्टर तेवढेच रुग्ण ऍडमिट करत असल्याने बाकी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्यानें आज कुणबी समाज उन्नती मंडळ भिवंडीच्या निवडक सदस्यांनी सावाद येथील कॉव्हिडं सेन्टर येथील प्रमुख डॉ प्रसन्न देशमुख व डॉ भारती गोटे यांची भेट घेतली व कॉव्हिडं सेन्टर मधील समस्या जाणून घेतल्या असता, ऑक्सिजन उपलब्ध नसल्याकारणाने आम्ही रुग्णांना ऍडमिट करू शकत नाही असं त्यांनी सांगितले त्यामुळे फक्त २०० रुग्ण ऍडमिट होऊ शकतात इतकंच ऑक्सिजन येथे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलें. जर शासन स्तरांवरून दिवसाला ९ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध झाला तर ५०० हुन अधिक रुग्णांवर येथे उपचार होऊ शकतात असं डॉ प्रसन्न देशमुख व डॉ भारती गोटे यांनी सांगितले.
 
त्यामुळे सावाद कॉव्हिडं सेंटर साठी जास्तीत जास्त ऑक्सिजन चा पुरवठा करण्यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत लगेच मंडळातर्फे संपर्क केला असता पालकमंत्री महोदयांनी जास्तीत जास्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करून देण्याचा आश्वासन यावेळी दिले आहे. यावेळी अंबाडी व पडघा विभागातील श्री विष्णू चंदे, उदय पाटील, श्रीकांत गायकर, किशोर जाधव, गुरुनाथ जाधव, दीपक पाटील, युवराज पाटील, मनोहर ठाकरे, पंकज पवार, अजित जाधव, सुदर्शन पाटील, मनोज पाटील, व आदी सहकारी उपस्थित होते.