सहा वर्षानंतर आई-वडील आणि चिमुकल्या मनीषाची घडवून आणली भेट

भूषण सुतार    19-Apr-2021
Total Views |
पाली/गोमाशी : तुळशिराम बाब्या पवार त्यांची पत्नी,गुलाबताई ,मुलगी कु,मनीषा आणि आई शकुंतला वडील बाब्या पवार व मामा सिताराम जाधव ,रा,चिंचवली गारभट आदिवासी वाडी ता .रोहा जि .रायगड असे एकाच कुटुंबातील हे सहा सदस्य सहा वर्षापुर्वी कोळसाभट्टी मालक संतोष विलास चव्‍हाण रा.आंबेवाडी ता.पाथर्डी.जि.अहमदनगर यांचेकडे कोळसाभट्टी कामाकरीता गेले होते.
 
मालक संतोष चव्‍हाण यांनी या सर्वाना सांगोळा येथे कोळसा भट्टीवर कामासाठी घेतले होते. या सर्वानी कायमस्वरूपी धंद्याकडे रहावे असे हा मालक सांगत होता,मात्र या लोकांना ते मान्य नव्हते.यामधे तुळशिरामने त्यांना सांगितले कि, आम्हाला जमणार नाही, आमचे हिशोब करा आम्ही गावी जातो,यावर संतोष चव्हाण यांनी हिशोब करून तुळशिराम बाब्या पवार, गुलाबताई,बाब्या वालक्या पवार आणि शकुंतला बाब्या पवार, यांना धंद्यातून हकलुन दिले.
 
javhar2200_1  H
 
लहान मुलगी कुमारी मनीषा तुळशिराम पवार आत्ताचे वय वर्षे १० हिला आणि सिताराम जाधव यांना या शेठने स्वत:कडे ठेऊन घेतले,तेव्हापासुन तुळशिराम पवार हे आपल्या मुलीला गावी पाठवण्या करीता मालक विलास चव्‍हाण याचेकडे विनंती करीत होते. दरम्यानच्या काळात तुळशिराम व गुलाबताई हे पोटासाठी मोलमजूरी करण्याकरीता पर जिल्ह्यात काम करीत होते. गेल्या वर्षी मनिषाची आई गुलाबताई ही स्वत: आपल्या लहानग्या मनीषाला आणण्यासाठी आंबेवाडी.ता.पाथर्डी येथे गेली. मात्र मालक संतोष चव्‍हाण याने या मुलीला तिचे ताब्‍यात दिली नाही,गुलाबताई ही आपल्या लहानग्या मनीषाला बघुन डोळ्यातून पाणी काढुण जड अंतकर्णाने तिथ़ुन माघारी फिरली, पोटच्या पोरीला आज माझ्यापासून दुर रहावे लागत आहे हे दु:ख मनात धरून गुलाबताई घरी आली आणि गेल्या आठवड्यात दि,७ एप्रिल २०२१ रोजी,तुळशिराम पवार आणि गुलाबताई यांनी सोपान सुतार अध्यक्ष, सर्वहारा जन आंदोलन रायगड यांची भेट घेतली व ही सर्व हकीकत त्यांना सांगीतली.
 
त्यांनी ही सर्व माहीती समजवून घेतली.त्या मालकाचा फोन नंबर नसल्याने संपर्क करता येत नव्हते. आम्ही पाथर्डी पोलिस ठाण्याचे पि.आय.ढेरे साहेेब यांना फोन द्वारे हि सर्व हकीकत सांगीतली,त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील ठाणेअंमलदार यांना गाडी घेऊन आंबेवाडी गावात पाठविले,मात्र संतोष चव्‍हाण हा गेल्‍या सहा महीण्यापासून इथे रहात नाही मात्र आदिवासी समाजाची एक लहाण मुलगी त्याचेकडे आहे असे आंबेवाडी गावातील लोकानी सांगीतले. मग सदर पोलिसांनी संतोष चव्‍हाण याचा मोबाईल नंबर मिळवून आम्हास दिला.त्या नंबरवर आम्ही संपर्क केला असता संतोष चव्‍हाण यांनी मी आत्ता मदगीरी जि.चित्रदुर्गा कर्नाटक येथे असल्याचे सांगीतले आणि मनीषाही आमच्‍या बरोबर असल्याचे कबुल केले,मात्र सिताराम जाधव हे माझे कडे नाहीत असे सांगीतले. त्यावेळी संतोष चव्‍हाण यास सांगीतले की मनीषा आणि सिताराम जाधव हे दोघेही चार दिवसात गावी चिंचवली गारभट आदिवासी वाडी ता.रोहा जि.रायगड यथे घेऊन यायचे आहे, चार दिवसात त्यांना घेऊन आलात नाहीत तर आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत ,त्यावेळी त्यांनी असे सांगीतले कि मी सोमवारी संध्याकाळी पर्यंत नक्‍कि त्यांना घेऊण येतो, त्या प्रमाणे सोमवारी दुपारी ३ वाजता मनीषा आपल्या गावी चिंचवली गारबाट येथे आई वडीलांचे समोर उभी राहीली आणि आपल्या मुलीला पहाताच आई बाबांचे डोळे पाण्याने भरूण आले,त्यांचा आनंद मावेनासा झाला दोघांनीही मनिषाला मिठी मारली.
 
अर्थातच तब्बल सहा वर्षा नंतर लहनगी मनिषा आणि आई वडील यांची भेट झाली,ही भेट आणि या मनिषाला शोधुन कोळसाभट्टी मालकाचे ताब्यातुन सोडवून आणण्यास संघटनेला यश आले आहे.या कामी पाथर्डी पोलीसठाणे अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.
- सोपान सुतार, अध्‍यक्ष सर्वहारा जन आंदोलन