भिवंडी ग्रामीण चे दमदार आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या निधीतून सावद कोविड सेंटर ला दोन रुग्णवाहीका

जनदूत टिम    18-Apr-2021
Total Views |
भिवंडी : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सावद कोविड सेंटर कोविड रुग्णांसाठी १०० बेड सुरु करण्यात आले आहे.कोरोनाची दुसरी लाटेच्या पार्श्वभुमीवर कोविड सेंटर सुरु करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील‌ व आमदार शांताराम मोरे सातत्याने जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करत होते.

shantaram44545_1 &nb 
 
या मागणीची दखल‌ घेऊन सावद कोविड सेंटर आँक्सिजनचा तुटवड्यामुळे १०० बेड तात्काळ कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहे.मुबलक आँक्सीजन पुरवठा झाल्यास लवकरात लवकर ८१८ बेडचे जम्बो कोविड सेंटर लवलरात लवकर सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी प्रांत अधिकारी डाँ.मोहन नळदकर यांनी माहिती दिली आहे.
 
यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या निधीतून दोन रुग्णवाहीका कोविड सेंटरला देण्यात येणार आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे,जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार,बांधकाम व आरोग्य सभापती कुंदन पाटील, मा. सभापती वैशाली चंदे, जिल्हा परिषद सदस्य रुता केणे, तहसिलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे, भगवान केणे,श्याम गायखे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.