भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

जनदूत टिम    18-Apr-2021
Total Views |
मुंबई : भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये रेमेडस्वीर इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी माहिती देणारे ऑनलाईन डॅशबोर्ड उपलब्ध करुन देण्यासाठी आणि रेमेडीसवीरच्या साठा करणाऱ्या व काळाबाजार करणार्‍यांना त्वरित मृत्यूदंड द्यावा या मागण्या करणारे पत्र लिहिले.

sanjay pandey_1 &nbs 
 
संजय जी म्हणाले, हे स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील कोविड ची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे आणि अजून गंभीर होत आहे. सर्वत्र दहशत आहे आणि लोक घाबरले आहेत. संक्रमणाची वाढती संख्या, बेडची कमतरता, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर जीवनरक्षक औषधांची अनुपलब्धता यांनी लोकांचे त्रास वाढवले आहेत. लोकांना आपल्या कुटुंबियांना मित्रांना वाचवण्यासाठी औषधाच्या शोधात इकडे तिकडे धावताना पाहणे हृदयद्रावक आहे. ही भीतीदायक परिस्थिती थांबविण्याची नितांत गरज आहे आणि लोकांना एका शासकीय पोर्टलच्या माध्यमातून याची माहिती उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक आहे.
 
मी राज्य सरकारला विनंती करतो, त्यांनी एक माहितीपूर्ण ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करावा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर जीवनरक्षक औषधांची उपलब्धता आणि त्यांची आवश्यकता याची सर्व माहिती दररोज त्यावर अपडेट करावी.
 
महामारीच्या या परिस्थितीत कठोर सुधारात्मक उपायांची आवश्यकता आहे. म्हणूनच, मी ठामपणे सूचित करतो की जर कुणी रेमडेसिवीर किंवा इतर कोणत्याही जीवनरक्षक औषधांचा साठा करीत असल्याचे किंवा काळा बाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याला फाशीची शिक्षा दिली जावी. या कठीण काळात आपल्याला लोकांना सर्व प्रकारचे पूर्ण आश्वासन देण्याची आणि त्यांना सर्वतोपरी मदत देण्याची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की हि माहिती उपलब्ध केल्याने लोकांना आधार मिळेल आणि त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळविण्यात मदत होईल.