शहापूर पोलीसांचे नागरिकांना आवाहन

जनदूत टिम    15-Apr-2021
Total Views |
शहापूर पोलीसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दिनांक-१४/०४/२०२१ रोजी सायंकाळी ०८:०० वाजल्यापासून ते दिनांक-०१/०५/२०२१ रोजी सकाळी ०७:०० वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असून संचार बंदी असणार आहे.
 
police-5_1  H x
 
त्या करीता ठीक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी व फिक्स पॉइंट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून जे नागरिक अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घरा बाहेर पडतील त्यांचे वाहन जप्त करून सदर इसामाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उ
दा. एखादी व्यक्ती मेडिकल ला जात असेल तर त्याच्याकडे डॉक्टरांनी दिलेली पावती सोबत असायला हवी, किंवा कोणी इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर त्याच्या सोबत आयकार्ड असायला हवे. तरी शहापूर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की , आपण शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
घरी रहा सुरक्षित रहा.