आमदार किसन कथोरेंच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

जनदूत टिम    15-Apr-2021
Total Views |
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपले कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली तातडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला FDA चे अधिकारी संदीपजी नरवणे, तहसिलदार अमोल कदम, सभापती दिपक पवार, मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, नितीन मोहपे सर आणि मुबाडमधील कोविड रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.
 
mur445_1  H x W
 
या बैठकीत मुरबाड शहर आणि तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून उपलब्ध बेडस्,रेमेडीसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
 
रेमेडीसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठा बाबत आमदार साहेबांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे मुरबाडकरांना दिलासा मिळाला असून यापुढेही याबाबतीत कोरोना रूग्ण आणि नातेवाईकांना वणवण करावी लागू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना साहेबांनी उपस्थित अधिकारी आणि डॉक्टर्स यांना केल्या.