कळंबोली येथे होणार जम्बो कोविड रुग्णालय

जनदूत टिम    15-Apr-2021
Total Views |

  • नगरविकास मंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश
  • नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तळोजातील लिंडे ऑक्सिजन कंपनीला भेट
  • बबनदादा पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागणीला मोठे यश

 पनवेल : पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तालुक्याच्या मनाने कोविड रुग्णांवर उपचार होणे शक्य नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने पाठपुरावा करून कळंबोली येथे २०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले. मात्र नागरिकांच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेवून महाविकास आघाडीचे नेते एवढ्यावरच न थांबता पनवेलमध्ये अजूनही जंबो कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेवून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेलला भेट देवून याबाबत पाहणी करून तसे निर्देश दिले.
 
ek256_1  H x W:
 
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी तळोजा येथील लिंडे ऑक्सिजन कंपनीला भेट दिली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत चाललेल्या या बैठकीमध्ये कोकण आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले, नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
 
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भेटी दरम्यान उपस्थित असलेले रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील तसेच महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या जंबो कोविड रुग्णालयाच्या मागणीबाबत कळंबोलीमधील कॉटन कंपनी येथे जंम्बो कोविड हॉस्पिटलसाठी मान्यता देत नगरविकास मंत्र्यानी तातडीने पनवेल आयुक्तांना कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले.
 
जनतेची नेमकी अडचण लक्षात घेवून बबनदादा पाटील व महाविकासआघाडीच्या नेत्यांनी काही दिवसापूर्वीच मागणी केली आणि अवघ्या दोन ते तीन दिवसातच राज्याचे नगरविकास मंत्री पनवेलमध्ये दाखल झाले. आता पनवेल क्षेत्राला आणखी एक कोविड रुग्णालय महापालिकेच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे नागरीकांच्यावतीने तसेच महाविकास आघाडीच्या वतीने या तातडीच्या निर्णयाबद्दल शिवसेना जेष्ठ नेते व रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे आभार मानले आहेत.