पंप चोरी प्रकरणी दोघांना अटक

जनदूत टिम    14-Apr-2021
Total Views |
कर्जत : कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोरिंगच्या पंपांची चोरी करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात, अधिक तपासात त्यांच्याजवळ सापडली ठासणीची बंदूक दोघांना मुद्दे मालासह कर्जत पोलिसांनी केली अटक.
 
ka7874_1  H x W
 
मागील काही दिवसांमध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे भालिवडी गावच्या हद्दीमध्ये घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून दोन बोरिंगचे पाण्याचे पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते, याबाबत कर्जत पोलीस ठाणे कॉ. गु. रं. नं.56/2021भा. द.वि.क.379,34 आणि कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 73/2021 भा. द.वि. क.379 अन्वये गुन्हे दाखल होता.
 
रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दूधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू अल्हाट, पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार बाबासाहेब जाधव, पोलीस अंमलदार किरण शेळके, पोलीस अंमलदार सचिन नरुटे, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे हे करीत होते.
 
याबाबत कर्जत पोलीस अधिक तपास करीत होते, सदर बोरिंगच्या पाण्याचे पंप चोरणारे चोरटे हे स्थानिक परिसरातील असल्याची शक्यता वर्तवून कर्जत पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून गुन्ह्यातील संशयित आरोपी करण भरत थेर राहणार सापेले तालुका कर्जत, तर दुसरा इसम विशाल प्रसाद भोईर राहणार वंजारवाडी तालुका कर्जत यांना चौकशी करिता ताब्यात घेतले, सदर संशयित आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता त्या दोघांनी मिळून सदरचे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले, त्यानंतर सदर आरोपींना गुन्ह्याच्या कामी अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांड घेऊन गुन्ह्यातील चोरून नेलेले 18 हजार रुपये किमतीचे 2 बोरिंग चे पाण्याचे पंप जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले.
 
त्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता सदर चे गुन्हे करतेवेळी आरोपी विशाल प्रसाद भोईर याच्या चारचाकी कारचा वापर केल्याचे तपासात त्यांनी कबूल केलं .त्याप्रमाणे सदरची होंडाई कंपनीची असेंट मॉडेलची चार चाकी कार गाडी नंबर एम एच-43/ व्ही 6868 ही गाडी जप्त केली, तिचे दरवाजे व मागील डिकी उघडून पाहिली असता सदर कारच्या मागील डिकी मध्ये कार्पेट च्या खाली एक लाकडी दस्ता असलेले ठासणीची बंदूक सापडली सदर बंदूक आरोपी कडे कशी याची विचारणा केली, असता सदरची बंदूक ही त्या दोघांची असल्याचे आरोपींनी कबूल केले आरोपींकडे अधिक चौकशी केली असता बंदुक जवळ बाळगणे बाबत आमच्याकडे कोणताही वैद्य परवाना नसल्यास सांगितले.
 
विनापरवाना व बेकायदेशीरपणे त्यांनी चारचाकी वाहनांमध्ये बाळगले स्थितीत आढळून आले, सदरची बंदूक 2 हजार रुपये किमतीची व 1 लाख रुपये किंमतीची चार चाकी कार पोलिसांनी जप्त केली, ठासणीची बंदूक आरोपींनी कुठून आणली तसेच त्याचा कोठे वापर केला आहे, आगर कसे याबाबत कर्जत पोलीस अधिक तपास करीत आहेत सदर गुन्ह्यांमध्ये 1लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.